वर्षभरात सिलिंडर २५०ने वाढला; सबसिडीही नाही !

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 17, 2021 04:28 AM2021-07-17T04:28:57+5:302021-07-17T04:28:57+5:30

सातारा : कोरोनात महागाईच्या झळा बसत असून, घरगुती गॅस सिलिंडरची टाकी नुकतीच २५ रुपयांनी महाग झाली तर वर्षभरात टाकीमागे ...

The cylinder increased by 250 during the year; No subsidies! | वर्षभरात सिलिंडर २५०ने वाढला; सबसिडीही नाही !

वर्षभरात सिलिंडर २५०ने वाढला; सबसिडीही नाही !

googlenewsNext

सातारा : कोरोनात महागाईच्या झळा बसत असून, घरगुती गॅस सिलिंडरची टाकी नुकतीच २५ रुपयांनी महाग झाली तर वर्षभरात टाकीमागे २५० रुपयांची वाढ झाली आहे. दुसरीकडे सबसिडीही बंद झाल्याने जगायचे कसे, असा प्रश्न सामान्यांना पडलाय. साधारणपणे पाच माणसांच्या कुटुंबाला महिन्याला एक सिलिंडरची टाकी लागते. त्यामुळे एका कुटुंबाला सध्या दर महिन्याला ८४० रुपये मोजावे लागत आहेत. महागाईच्या झळांनी अगोदरच होरपळलेल्या सर्वसामान्यांना हा मोठा आर्थिक फटका बसत आहे. त्यातच मागील सव्वा वर्षापासून गॅसवरील सबसिडीही बंद झाली आहे. त्यामुळे आर्थिक गणित कोलमडल्याचे दिसून येत आहे.

..............

महिना सिलिंडर दर

जुलै २०२० ५९९

ऑगस्ट ५९९

सप्टेंबर ५९९

ऑक्टोबर ५९९

नोव्हेंबर ५९९

डिसेंबर ६९९

जानेवारी २०२१ ६९९

फेब्रुवारी ७९९

मार्च ७९९

एप्रिल ८१४

मे ८१४

जून ८१४

जुलै २०२१ ८३९

...........................................

कोट :

शहरात चूलही पेटवता येत नाही...

कोरोना विषाणूच्या संकटामुळे वर्षभरापासून कामे मिळवताला अडचणी येत आहेत. अनेकवेळा घरातच बसून राहण्याची वेळ आली आहे. घरातील पुरुष मंडळींचे पगार कमी झाले आहेत. त्यातच सिलिंडर टाकीचे दर वाढल्याने काटकसर करावी लागत आहे. शहरात चूलही पेटवता येत नाही, अशी स्थिती आहे.

- नीलिमा पाटील, गृहिणी

...............................

कोरोनामुळे मागील वर्षभरापासून महागाईचाच सामना करावा लागत आहे. कारण, भाज्या महाग झाल्या आहेत. त्यातच सिलिंडर टाकीचे दरही वाढतच चालले आहेत. त्यामुळे सर्वसामान्यांनी जगायचे कसे, असा प्रश्न आहे. शासनाने सिलिंडरवर दिलेली सबसिडीही बंद केली. त्यामुळे एका टाकीसाठी आता ८४० रुपये मोजावे लागत आहेत.

- सुमन काळे, गृहिणी

...................................................

Web Title: The cylinder increased by 250 during the year; No subsidies!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.