डागडूजी नसल्याने हातपंपाना चढला गंज!

By admin | Published: March 28, 2017 04:32 PM2017-03-28T16:32:28+5:302017-03-28T16:32:28+5:30

पाणीकपात झाल्यास परिस्थिती बिकट : १२८ पैकी २४ कुपनलिकांची दुरवस्था; पिण्यासाठी वापरलं जातं पाणी; पण तहान भागणार कशी?

Dagaduji due to the Ganj pile! | डागडूजी नसल्याने हातपंपाना चढला गंज!

डागडूजी नसल्याने हातपंपाना चढला गंज!

Next

आॅनलाईन लोकमत

कऱ्हाड : शहरातील लोकांना शुद्ध व नियमितपणे पाणी मिळावे यासाठी कऱ्हाड पालिकेने शहरात सुमारे वीस वषार्पूर्वी १२८ कुपनलिका बसविल्या. या कुपनलिकांची मात्र आज मोठ्या प्रमाणात दुरावस्था झाली आहे. पालिकेच्यावतीने डागडुजी करण्याअभावी या कुपनलिकांना गंज चढला आहे. ऐन उन्हाळ्यात पाणी कपात झाल्यास या कुपनलिकाच शहरवासियांची तहान भागवत असतात.

कऱ्हाड शहरासह वाढीव त्रिशंकू भागातील लोकांची पाण्याची समस्या दूर व्हावी म्हणून कऱ्हाड नगरपालिकेने शहरात ठिकठिकाणी कूपनलिका बसविल्या. भूगभार्तून पाईपच्या माध्यमातून हाताच्या दाबाने पाणी वर काढता यावे अशा पद्धतीने कुपनलिकांची रचना करण्यात आली. त्याचा वापर आजही खेडोपाडी नियमित केला जातो. मात्र, शहरातील कुपनलिकांना सध्या गंज चढला आहे. पालिकेकडून नियमितपणे देखभाल व दुरूस्ती केली न गेल्याने पाणी असुनही ती पिण्यायोग्य राहिलेले नाही.

शहरातील नागरिकांसाठी एकीकडे पालिकेने चोवीस तास पाणी योजना सुरू करण्याचा निर्णय घेतला. तशी योजनाही शहरात युद्धपातळीवर पूर्णवत केली जात आहे. वाढता उन्हाळा पाहता तसेच त्याजोडीला भीषण पाणीटंचाईची समस्या निर्माण होण्याची भिती पाहता पाणी बचत करणे व ते जपून वापरणे गरजेचे आहे. शहरातील नागरिकांना दुषित पाण्याच्या समस्येला अनेकदा सामोरे जावे लागत आहे. मात्र, कुपनलीका चोवीस तास शुद्ध पाणी देत असतानाही त्याकडे पालिका डागडुजीसाठी लक्ष देत नाही ही गंभीर बाब आहे.

कऱ्हाड शहरात अस्तित्वात असणाऱ्या १२८ कुपनलिकांपैकी चोवीस कुपनलिकांची अत्यंत दुरावस्था झाली आहे. यामध्ये शाहू चौक येथे पाण्याची बोरींग आहे. त्यातील पाणीही शुद्धही आहे. मात्र त्याची पाईप तुटलेली आहे. रणजीत टॉवर परिसरात दोन कुपनलिका बोरींगमध्ये बदलण्यात आल्या आहेत. मात्र, त्यासुद्धा बंद पडल्या आहेत. पाटण कॉलनीत पूर्वी कुपनलिका होती. मात्र, वाहनधारकांकडून वाहन धुण्यासाठी येथील पाण्याचा वापर केला जाऊ लागल्याने पालिकेने ती कुपनलिकाच काढून टाकली. सध्या गरज असतानाही येथे कुपनलिका बसविण्यात आलेली नाही.

पांढरीच्या मारूती मंदिरासमोरील कुपनलिकेचे बोरींग केले आहे. नूतन मराठी शाळा शिवाजी क्रीडा संकुलाच्या शेजारील कुपनलिका गंजल्या असून मोडकळीस आल्या आहेत. मंगळवार पेठेतही अनेक कुपनलिकेत पाणी असून त्या मोडकळीस आल्या आहेत.
नगरपालिकेच्या नवीन भाजी मंडईसाठी शेजारील असलेल्या कुपनलिकेचा वापर केला जात आहे. तर श्री चेंबर्स येथील कुपनलिक बंदस्थितीत आहे. प्रभात चित्रपटगृह परिसर, मंडई परिसरासह एस. टी. स्टँड परिसरात असलेल्या कुपनलिकांभोवती अस्वच्छतेचे साम्राज्य पसरले आहे.

योजना बंद; पण कुपनलिका चालू

कऱ्हाडकरांसाठी पालिकेने चोवीस तास पाणी योजना उभारण्याचे काम सुरू केले. योजनेचे दोन -तीन वर्षांपासून काम सुरू होते. मात्र, ती मध्यंतरी कालावधीत बंद पडली होती. याऊलट दहा ते पंधरा वर्षांपूर्वी बसविण्यात आलेल्या काही कुपनलिका अजुनही चालू आहेत. पालिकेने या कुपनलिकांची दुरूस्ती व देखभाल करणे गरजेचे आहे. कुपनलिकांतून नागरीकांना पाणी मिळत असून त्याची जपणूक करणेही तितकेच गरजेचे आहे.

कुपनलिकांना कचऱ्याचा वेढा

१) शनिवार पेठेतील चर्चजवळील कुपनलिका व टाऊन हॉल पाठिमागील कुपनलिकांची दुरावस्था झाली आहे.
२) जनता बँकेसमोरील बुधवार पेठेतील कुपनलिका गंजल्या आहेत. थोरवडे गल्लीतील कुपनलिकेमधून चांगले पाणी मिळत असल्याचे येथील नागरिक सांगतात.
३) डॉ. बाबासाहेब आंबेडकर पुतळा परिसरातील जुन्या पोस्ट आॅफीससमोरील कुपनलिका कचरा कुंडीत सापडली आहे.
४) ) शनिवार पेठेतील गणपती मंदिर पाठिमागे व हिंदकेसरी पैलवान दिवंगत शामराव मुळीक चौकातील कुपनलिका तेथील परिसरातील रहिवाशांना मोठा आधार वाटतात. ज्यावेळी पालिकेकडून पाणी पुरवठा बंद होतो तेव्हा याच कुपनलिकांमधून रहिवाशांना पिण्यासाठी पाणी मिळते.
५) आंबेडकर क्रिडांगण परिसरातील कुपनलिका तर कचऱ्यानेच वेढली आहे. बंद स्वरूपात असलेल्या या कुपनलिके शेजारीच कचरा डेपो आहे.
६) महिला महाविद्यलयासमोरील कुपनलिकाही दुरावस्थेत आहे.

पाणी पुरवठ्यासाठी सात टाक्या

कऱ्हाडात पाणी पुरवठ्यासाठी पालिकेच्या सात टाक्या आहेत. त्यापैकी मार्केट यार्डमधील टाकीची पाणी साठवण क्षमता २० लाख लिटर, टाऊन हॉलनजीकच्या टाकीची १५ लाख लिटर, रविवार पेठेतील टाकीची १५ लाख लिटर, सोमवार पेठेतील टाकीची ७ लाख लिटर, रूक्मिणीनगरमधील टाकीची २० लाख लिटर, सुर्यवंशी मळ्यातील टाकीची १५ लाख लिटर व गजानन हौसींग सोसायटीमधील टाकीची पाणी साठवण क्षमता ६ लाख ५० हजार लिटर आहे.

हातपंपावरूनही पाणी पुरवठा
विद्यानगर भागासाठी बुस्टींग पंपींग स्टेशनद्वारे ७ लाख लिटर पाणी पुरविण्यात येते. शहरात कुपनलिकांची संख्या १२८ आहे. तर शहर ग्रामिण भागात ५१ कुपनलिका आहेत. त्यापैकी पंताचा कोट, मंगळवार पेठ, पांढरीचा मारूती, शिवाजीनगर, उपजिल्हा रूग्णालय, शनिवार पेठेतील शेलारांच्या घराजवळ, मोहिते हॉस्पिटलजवळ व रणजीत टॉवरसमोरच्या हातपंपावर पालिकेने वीजपंप बसविले आहेत.


कऱ्हाडची पाणी वितरण व्यवस्था

कऱ्हाडची लोकसंख्या : ७४ हजार ३५५
नळ कनेक्शनची संख्या : ११ हजार १०४
वितरण नलिकांची लांबी : ५४ किलोमीटर
पाणी आरक्षण परवाना : ६.५७ द. ल. घन लिटर
दररोजचा पाणीपुरवठा : १४.०६ दशलक्ष लिटर
दरडोई दरदिवशी पुरवठा : १४९ लिटर

Web Title: Dagaduji due to the Ganj pile!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.