दहिवडीत नगरसेवक-मुख्याधिकाºयांमध्ये खडाजंगी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2017 07:46 PM2017-07-29T19:46:44+5:302017-07-29T19:47:32+5:30

dahaivadaita-nagarasaevaka-maukhayaadhaikaaoyaanmadhayae-khadaajangai | दहिवडीत नगरसेवक-मुख्याधिकाºयांमध्ये खडाजंगी

दहिवडीत नगरसेवक-मुख्याधिकाºयांमध्ये खडाजंगी

Next
ठळक मुद्दे आठ दिवसांत कामाचा निपटारा करा : सत्ताधाºयांकडून नगरपंचायतीला टाळे ठोकण्याचा इशारादहिवडीमध्ये प्राधिकरणचे कायार्लायच नाहीनागरिकांनी विकत पाणी घेतले.

Marathi

English

   

Translate message

Turn off for: Marathi


दहिवडी : येथील नगरपंचयातीच्या नियोजनाचा बोजवारा उडाल्याने गेले आठ दिवस सर्वसामान्य जनतेला पाणी मिळाले नाही, याबाबत सत्ताधारी नगरसेवकच आक्रमक झाले. पाणी प्रश्नासह विविध विकासकामे पेंडिंग राहिल्याने नगरसेवक व मुख्याधिकारी कपील जगताप यांच्यात खडाजंगी झाली. आठ दिवसांत कामांचा निपटारा न झाल्यास नगरपंचयातीला टाळे ठोकण्याचा इशारा सत्ताधारी नगरसेवकांनीच दिला.


दहिवडी गावाला पाणीपुरवठा करणाºया आंधळी धरणातील जॅकवेलची मोटार जळाली. ती दुरुस्त करून येईपर्यंत खूप वेळ गेला. अजूनही जकवेलची देखभाल महाराष्ट्र प्राधिकरणकडे आहे. विशेष म्हणजे, या कार्यालयाचे कामकाज वडूजमधून चालते.

दहिवडीमध्ये प्राधिकरणचे कायार्लायच नाही. ‘आंधळं दळतंय अन् कुत्रं पीठ खातंय,’ या म्हणीप्रमाणे येथील अवस्था झाली आहे. विद्युत मोटार दुरुस्त करून येईपर्यंत विहिरीतील मोटार जळाली. यामुळे पाणी पुरवठ्यात व्यत्यय आला. स्टँडबाय तीन मोटारी असताना या मोटारी ही नादुरुस्त होत्या. यामुळे गेले आठ दिवस दहिवडीतील नागरिकांना पिण्याचे पाणीच मिळाले नाही. काही नागरिकांनी तर विकत पाणी घेतले.

पाणी प्रश्न गंभीर बनत चालल्यामुळे चिडलेल्या सत्ताधारी नगरसेवकांचा संयम सुटला व त्यांनी नगरपंचयातीमधील कारभाराचे वाभाडे काढले. पाणी प्रश्नावरून खडाजंगी सुरू असताना नगरसेवकांनी अन्य मुद्दे मांडून नगरपरिषदेच्या कारभाराचे वाभाडे काढले.

पाणीपुरवठा सभापती दिलीप जाधव, महिला व बालकल्याण सभापती अर्चना खरात, धनाजी जाधव, बाळासाहेब गुंडगे, समीर योगे, सिद्धार्थ गुंडगे, महेश कदम, रमेश जाधव, पोपटराव खरात यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते.

Web Title: dahaivadaita-nagarasaevaka-maukhayaadhaikaaoyaanmadhayae-khadaajangai

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.