दैनंदिन खर्च ‘ट्रू व्होटर अॅपवर’
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 8, 2021 06:09 AM2021-01-08T06:09:16+5:302021-01-08T06:09:16+5:30
सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च दैनंदिन पध्दतीने ‘ट्रू व्होटर अॅप’वर भरणे आवश्यक आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी ...
सातारा : ग्रामपंचायत निवडणूक लढणाऱ्या उमेदवारांनी निवडणुकीचा खर्च दैनंदिन पध्दतीने ‘ट्रू व्होटर अॅप’वर भरणे आवश्यक आहे, अशी माहिती उपजिल्हाधिकारी महसूल कीर्ती नलावडे यांनी दिली.
सातारा जिल्ह्यातील ८७८ ग्रामपंचायतींची निवडणूक प्रक्रिया सुरू आहे. निवडणूक विषय सर्व बाबींवर लक्ष ठेवण्यासाठी निवडणूक आयोगाने ग्रामपंचायत निवडणुकीमध्ये ट्रू व्होटर अॅपचा वापर करण्याच्या सूचना केल्या आहेत. त्यानुसार सातारा जिल्ह्यामधील निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी ग्रामपंचायतीच्या निवडणुकांमध्ये केलेल्या दैनंदिन व एकूण खर्चाचा तपशील राज्य निवडणूक आयोगाच्या ट्रू व्होटर अॅपमध्ये भरणे अनिवार्य केले आहे.
यासाठी उमेदवारांनी गुगल प्लेस्टोअरवरुन ट्रू व्होटर अॅप डाऊनलोड करुन त्यामध्ये नोंदणी करणे आवश्यक आहे. याबाबत उमेदवारांना काही अडचणी असल्यास त्यांनी तालुक्यातील संबंधित तहसीलदार यांच्याशी संपर्क साधावा. याबाबत जिल्हाधिकारी शेखर सिंह यांनी सर्व उपविभागीय अधिकारी व तहसीलदार यांची गुरुवारी बैठक घेऊन त्यांना सूचना केल्या.
चौकट..
तीस दिवसांत खर्चाचा तपशील बंधनकारक
निवडणूक लढविणाऱ्या सर्व उमेदवारांनी (बिनविरोध, विजयी, पराभूत) निवडणुकीचा निकाल प्रसिध्द झाल्यापासून ३० दिवसांच्या आत एकत्रित खर्चाचा तपशील विहित नमुन्यात प्रतिज्ञापत्रासह सादर करणे हे देखील अनिवार्य आहे.