एसटी बसच्या धडकेत कार, दुचाकीचे नुकसान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 18, 2020 08:29 PM2020-11-18T20:29:29+5:302020-11-18T20:30:17+5:30

accident, sataranews वाठार स्टेशनहून वाईकडे निघालेल्या एसटी बस चालकाचे एसटीवर नियंत्रण सुटल्याने एसटीने एका कार व बसला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही; परंतु दोन्ही वाहनांचे तब्बल ८ लाख १५ हजारांचे नुकसान झाले.

Damage to car, two-wheeler in ST bus collision | एसटी बसच्या धडकेत कार, दुचाकीचे नुकसान

एसटी बसच्या धडकेत कार, दुचाकीचे नुकसान

Next
ठळक मुद्देएसटी बसच्या धडकेत कार, दुचाकीचे नुकसानवाठार स्टेशन पोलीस ठाण्यात फिर्याद

पिंपोडे बुद्रुक : वाठार स्टेशनहून वाईकडे निघालेल्या एसटी बस चालकाचे एसटीवर नियंत्रण सुटल्याने एसटीने एका कार व बसला धडक दिली. या अपघातात कोणीही जखमी झाले नाही; परंतु दोन्ही वाहनांचे तब्बल ८ लाख १५ हजारांचे नुकसान झाले.

याबाबत अधिक माहिती अशी की, मंगळवार, दि. १७ रोजी दुपारी एकच्या सुमारास एसटी बस वाठार स्टेशनहून वाईच्या दिशेने निघाली होती. पिंपोडे बुद्रुक एसटी बस थांब्यानजीक येताच बस चालकाचे गाडीवरील नियंत्रण सुटून एसटी बसने रस्त्याच्या विरुद्ध दिशेला काही अंतरावर असलेल्या कार व दुचाकीला जोरदार धडक दिली. या धडकेत कोणीही जखमी झाले नाही.

या घटनेची फिर्याद प्रेम कुमार धर्माधिकारी यांनी वाठार स्टेशन पोलीस ठाण्यात दिली असून, पोलीस पुढील तपास करत आहेत.

Web Title: Damage to car, two-wheeler in ST bus collision

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.