दोन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी

By admin | Published: July 10, 2017 11:18 PM2017-07-10T23:18:24+5:302017-07-10T23:18:24+5:30

दोन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी

Dancing with two girls in the well | दोन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी

दोन मुलींसह विवाहितेची विहिरीत उडी

Next


लोकमत न्यूजनेटवर्क
सातारा : नवरा व नणंद करत असलेल्या छळाला कंटाळून विवाहितेने दोन मुलींसह विहिरीत उडी घेतली. यातून दोन्ही मुली बचावल्या तर आईचा मृत्यू झाला. ही घटना सोमवारी सकाळी सातारा तालुक्यातील जकातवाडी येथे घडली. या घटनेने तालुक्यात एकच खळबळ उडाली.
संगीता विजय मोरे (वय ३२) असे मृत्यू झालेल्या महिलेचे नाव आहे. पूनम (वय १३) तर पायल (८) असे बचावलेल्या मुलींची नावे आहेत. पोलिसांकडून मिळालेल्या माहितीनुसार, संगीता हिचा भाऊ प्रशांत तानाजी ननावरे यांनी सातारा तालुका पोलिस ठाण्यात दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे की, संगीता ही नवरा विजय बाबूराव मोरे (सध्या रा. जकातवाडी, मूळ. रा. तिळवणे, ता. हातकणंगले, जि. कोल्हापूर) व दोन मुलींसह राहत होती.
पती विजयचे कोणत्या तरी महिलेशी अनैतिक संबंध असल्याचा संशय संगीताला येत होता. त्यातून त्यांच्यात वारंवार खटके उडत होते. नवरा विजय व नणंद प्रियंका संगीताला वर्षापासून शिवीगाळ, दमदाटी करत मारहाण करत होते.
मानसिक व शारीरिक छळाला कंटाळून संगीताने सोमवारी सकाळी दोन्ही मुलींसह विहिरीत उडी घेतली. त्यातून दोन्ही मुली बचावल्या असून, संगीताचा मात्र मृत्यू झाला. याप्रकरणी नवरा विजय व नणंद प्रियंका यांच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलिस उपनिरीक्षक एस. ए. पाटील तपास करीत आहेत.
कठड्याला धरल्याने दोघी वाचल्या
संगीताने सर्वप्रथम लहान मुलगी पायल हिला विहिरीत फेकले. त्यानंतर मोठी पूनमला धरून स्वत: विहिरीत उडी घेतली. मात्र, घाबरलेल्या पूनमने कठड्याला धरल्याने ती वरच राहिली अन् आई आत पडली. पूनमने आरडाओरड केल्यानंतर आलेल्या ग्रामस्थांनी पायलला बाहेर काढले. तोपर्यंत आईचा मृत्यू झाला.
मुलीकडूनच लिहून घेतली चिठ्ठी
विजय हा रविवारीच घरातून दागिने घेऊन गायब झाला होता. संगीताने सोमवारी पहाटे मोठी मुलगी पूनमकडून आत्महत्या करत असल्याची चिठ्ठी लिहून घरात ठेवली होती. त्यात नवऱ्याच्या त्रासास कंटाळून आत्महत्या करीत असल्याचे म्हटले आहे.

Web Title: Dancing with two girls in the well

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.