मलकापुरात दुसऱ्या दिवशीही पालिकेचा दंडुका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 28, 2021 04:27 AM2021-05-28T04:27:57+5:302021-05-28T04:27:57+5:30
मलकापूर : येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत गुरुवारी दुसऱ्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. ...
मलकापूर : येथील पालिकेने जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशाची कडक अंमलबजावणी करत गुरुवारी दुसऱ्या दिवशी विनाकारण फिरणाऱ्या नागरिकांवर दंडात्मक कारवाई केली. त्यांच्याकडून १७ हजार ६०० रुपयांचा दंड वसुल केला. मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह कर्मचारी स्वतः रस्त्यावर येऊन नागरिकांची कसून चौकशी करत आहेत.
शहरात नऊ ठिकाणी तपासणी नाक्यावर कसून तपासणी करण्यात येत आहे. विनाकारण फिरणाऱ्यांची कोरोना चाचणी करणार असल्याने पहिल्या दिवशी रस्त्यावर शुकशुकाट होता. मात्र दुसऱ्या दिवशीही तपासणी नाक्यावर दिवसभर पालिकेचे कर्मचारी तळ ठोकून होते. केवळ वैद्यकीय कारणास्तव नागरिकांना इतरत्र जाण्याची सुट देण्यात येत होती. विनाकारण रस्त्यावर येणाऱ्या नागरिकांना पालिकेचे कर्मचारी विनंती करून घरी जाण्याचे आवाहन करत होते. तरीही मास्क न घातलेले, विनाकारण रस्त्यावर फिरणारे, चोरून व्यवसाय करणाऱ्या नागरिकांवर मुख्याधिकारी मर्ढेकर यांनी दंडात्मक कारवाई करत १७ हजार ६०० रुपयांचा दंड वसूल केला. शहरातील २६ कॉलन्यांमधील मुख्य रस्ते सील केले होते. त्यामुळे रस्त्यावर शुकशुकाट होता. पालिकेच्या कडक अंमलबजावणीस नागरिकांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला.
फोटो २७ मलकापूर
मलकापूरच्या नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहुल मर्ढेकर यांच्यासह सर्व प्रभाग अध्यक्ष नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक तपासणी नाक्यावर उपस्थित होते. (छाया : माणिक डोंगरे)
===Photopath===
270521\img_20210526_201233.jpg
===Caption===
फोटो कॕप्शन
नगराध्यक्षा निलम येडगे, उपनगराध्यक्ष मनोहर शिंदे, मुख्याधिकारी राहूल मर्ढेकर यांच्यासह सर्व प्रभाग अध्यक्ष नोडल अधिकारी व त्यांचे सहाय्यक त्या त्या तपासणी नाक्यावर उपस्थित होते. ( छाया- माणिक डोंगरे)