धनगर समाज आरक्षणाबाबत दुटप्पीपणा!

By Admin | Published: March 29, 2015 12:40 AM2015-03-29T00:40:33+5:302015-03-29T00:43:13+5:30

अजित पवारांचा निषेध : सामाजिक, आर्थिक कुचंबणेसाठीच सर्व प्रयत्न

Dangapathy about Dhanajar samaj reservation! | धनगर समाज आरक्षणाबाबत दुटप्पीपणा!

धनगर समाज आरक्षणाबाबत दुटप्पीपणा!

googlenewsNext

सातारा : ‘धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देणे घटनाबाह्य ठरेल, अशी शिफारस आघाडी शासनाच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखालील समितीने केली होती,’ असा गौप्यस्फोट महसूलमंत्री एकनाथ खडसे यांनी केल्यानंतर सातारा जिल्ह्यात याबद्दल तीव्र प्रतिक्रिया उमटल्या आहेत. धनगर समाजातील मान्यवरांनी अजित पवार यांचा निषेध केला आहे. पवार घराण्याची दुटप्पी चाल आता समोर आली आहे, अशा शब्दातही त्यांनी हल्लाबोल केला आहे. धनगर समाज आर्थिक, सामाजिक, राजकीयदृष्ट्या सुधारू नये, यासाठीच हे प्रयत्न असल्याचेही त्यांनी स्पष्ट केले.
धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती देण्याच्या मुद्द्यावरून शुक्रवारी विधान परिषदेत सत्ताधारी आणि विरोधकांत जोरदार खडाजंगी झाली. राज्यातील धनगर समाजाला आरक्षण देण्यास सरकार चालढकल करत असल्याचा आरोप विरोधकांनी करताच आघाडी शासनाच्या काळात अजित पवार यांच्या नेतृत्वाखाली नेमलेल्या समितीने धनगर समाजाला सवलती देणे घटनाबाह्य ठरेल, अशी शिफारस केली होती, असा गौप्यस्फोट एकनाथ खडसे यांनी केला. त्यानंतर राज्यातील धनगर समाजात तीव्र नाराजी पसरली आहे. त्याचबरोबर माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांचा निषेधही करण्यात आला.
याबाबत सातारा जिल्ह्यातील धनगर समाजाच्या अनेक नेत्यांनी अजित पवार यांच्याबरोबरच शरद पवार यांच्यावरही टीकेची झोड उठविली. धनगर समाजाला अनुसूचित जमातीच्या सवलती मिळू नयेत म्हणूनच सर्व राजकारण सुरू आहे. धनगर समाजाची आर्थिक, सामाजिक, शैक्षणिक, राजकीयदृष्ट्या कुचंबणा व्हावी म्हणून हे सर्व प्रयत्न सुरू आहेत. पण, घटनेने दिलेले आरक्षण राजकर्त्यांमुळेच अडकले आहे.
अजित पवार यांनी केलेली शिफारस चुकीची आहे. एकप्रकारे त्यांनी धनगर समाजाचा नाहीतर घटनेचाच अपमान केलेला आहे. एकीकडे धनगर समाजाला आरक्षण देण्याविषयी बोलायचे आणि दुसरीकडे मिळू नये म्हणून प्रयत्न करायचे. ही पवार घराण्याची नेहमीचीच दुटप्पी चाल आहे. याला राज्यातील धनगर समाज बळी पडणार नाही.
घटनेने दिलेले आरक्षण हे आम्ही मिळविणारच आहे, असा स्पष्ट इशाराही धनगर समाजातील जानकर, खटके आणि गावडे यांच्यासह इतर नेत्यांनी दिला. (प्रतिनिधी)
 

Web Title: Dangapathy about Dhanajar samaj reservation!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.