विद्युततारांचा धोका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 24, 2021 04:26 AM2021-06-24T04:26:29+5:302021-06-24T04:26:29+5:30
कऱ्हाड : शहरातील नागरिक व पक्ष्यांच्या जिवाला सध्या धोका निर्माण झाला आहे; कारण शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर ...
कऱ्हाड : शहरातील नागरिक व पक्ष्यांच्या जिवाला सध्या धोका निर्माण झाला आहे; कारण शहरात मुख्य रस्त्यांसह अंतर्गत भागातील रस्त्यांवर तसेच त्या कडेला असलेल्या घरांवरील विद्युततारा खाली आलेल्या आहेत. या तारांतील विद्युतप्रवाहामुळे काही पक्षी मृत्युमुखी पडले आहेत.
वृक्षसंपदांवर कुऱ्हाड
कुसूर : कऱ्हाड तालुक्यातील अनेक गावांत सामाजिक वनीकरणात मोठ्या प्रमाणात झाडे लावण्यात आली होती. मात्र, त्यांतील अनेक झाडे गायब झाली आहेत. योग्य देखभाल न राखल्यामुळे रोपे जळून गेली आहेत; तर काही ठिकाणी वनीकरणातील झाडे जळणासाठी तोडून नेण्यात आली आहेत.
भारनियमनात वाढ
कऱ्हाड : ग्रामीण भागात सध्या भारनियमनात वाढ होत आहे. दिवसासह रात्रीही वीज जात असल्याने ग्राहक हैराण झाले आहेत. ग्रामीण भागात विजेवरील अनेक छोटे-मोठे व्यवसाय असून, दिवसासह रात्रीही भारनियमन केले जात असल्याने याचा फटका व्यावसायिकांनाही बसत आहे.
फूलझाडांना बहर
कऱ्हाड : शहरात पालिका प्रशासनाच्या वतीने सौंदर्याच्या दृष्टीने आयलँडमध्ये विविध प्रकारची फूलझाडे लावण्यात आलेली आहेत. पालिकेकडून त्याचे संवर्धन केले जात आहे. या फूलझाडांना चांगलाच बहर आला असून शहराच्या सौंदर्यात भर पडत आहे.