अंबेनळी घाटात भगदाड वाहतूक धोक्यात

By admin | Published: July 8, 2017 06:30 PM2017-07-08T18:30:00+5:302017-07-08T18:30:00+5:30

अवघड वळण अन् तिव्र उतारावर खड्डा अडवतोय रस्ता

The danger of transit traffic in the unbeatable lane | अंबेनळी घाटात भगदाड वाहतूक धोक्यात

अंबेनळी घाटात भगदाड वाहतूक धोक्यात

Next

आॅनलाईन लोकमत

सातार, दि. ८ : महाबळेश्वर, प्रतापगडाला जोडणारा अंबेनळी घाट धोकादायक बनला असून घाटात नव्याने झालेल्या डांबरीकरणाला पहिल्याच पाऊसात प्रचंड खड्डे पडले आहेत. नादुरूस्त संरक्षक कठडे, रस्ताच्या मध्यभागी पडलेले भगदाड अपघातांना निमंत्रण देत आहेत.

महाबळेश्वरला येणारा प्रत्येक पर्यटक प्रतापगडाला भेट देतोच पण या ठिकाणी जाण्यासाठी असलेल्या अंबेनळी घाटातील रस्ता अनेक ठिकाणी उखडला आहे. दरड कोसळण्याचे प्रमाण दिवसेंदिवस वाढत असल्याने पर्यटकांच्या सुरक्षेचा मुद्दा ऐरणीवर आला आहे. महाबळेश्वर व परिसरात गेल्या वर्षीच्या तुलनेत यंदा जास्त पाऊस पडला आहे.

महाबळेश्वर ते प्रतापगड रस्त्यालगत ठिकठिकाणी धबधबे असल्याने परिसर निसर्गरम्य झाला आहे. अनेक पर्यटक घाटात थांबून निसर्गाचा आनंद घेतात. मात्र, कोणत्याही धबधब्याजवळ संबधीत विभागाकडून सावधान तेचे फलक लावलेले दिसत नाहीत. अंबेनळी घाटात मेटतळे गावाजवळच रस्त्याच्या मध्यभागी भगदाड पडल्यामुळे वाहन चालकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे. संरक्षक कठड्यांची अवस्थांही तशीच अवस्था झाली आहे.

सततच्या दाट धुक्यामुळे रात्री तसेच दिवसाही वाहन चालवताना कसरत करावी लागते. ठिकठिकाणी संरक्षक कठडेच गायब असल्याचे चित्र दिसत आहे या घाटातील अवघड वळणावर पडलेल्या खड्ड्यांमुळे अंगाचा थरकाप उडतो. तेथे झाडपाला टाकला आहे. पण अचानक खड्डा समोर आल्यास चुकवणे अवघड जाते.

- नरसिंग जगताप, पुणे.

 

Web Title: The danger of transit traffic in the unbeatable lane

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.