पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 5, 2019 07:02 PM2019-08-05T19:02:41+5:302019-08-05T19:03:34+5:30

पार्ले ता कऱ्हाड येथील बनवडी आणि पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक बनला आहे. पुलाचे खालच्या बाजूने सिमेंट काँंक्रीट निघून गेले आहे तर स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे पुल कमकुवत बनला आहे.

 Dangerous bridge over Parley | पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक

पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक

Next
ठळक मुद्दे पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक स्ट्रक्चरल आँडिट करून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे

कोपर्डे हवेली : पार्ले ता कऱ्हाड येथील बनवडी आणि पार्ले दरम्यानचा ओढ्यावरील पुल धोकादायक बनला आहे. पुलाचे खालच्या बाजूने सिमेंट काँंक्रीट निघून गेले आहे तर स्टिल उघडे पडले आहे. त्यामुळे पुल कमकुवत बनला आहे.

पार्ले येथील पूल बांधून जवळपास पन्नास वर्ष झाले असून आजच्या स्थितीला पुलाची परिस्थिती धोकादायक बनली आहे माजी आमदार व माजी जिल्हा परिषदेचे अध्यक्ष कै आबासाहेब पार्लेकर यांच्या प्रयत्नातून 1965 -66 च्या च्या दरम्यान हा पूल बांधण्यात आला. तेव्हापासून ज्यावेळी मोठा पाऊस झाला तेव्हा तेव्हा या पुलावरून पाणी गेले आहे . या पुलाला जवळपास पन्नास वर्ष पूर्ण झाले आहेत. अनेकदा या पुलावरून पाणी गेले असल्याने फुलाच्या अवस्था दयनीय झाली.

या पुलावरून नेहमीच लहान-मोठ्या व अवजड वाहनांची रहदारी सुरू असते ऊसाची वहातुक याच पुलावरून होते हा पूल पार्ले गावासाठी अतिशय महत्त्वाचा असून या पुलावरून पाणी गेल्यास या गावाचा संपर्क तुटतो.दरवर्षी ओढ्याला मोठ्या प्रमाणात पाणी येते. ओढ्याच्या पाण्याचा प्रवाह वेगाने असतो त्यामुळे या पुलाचे सिमेंट निघून जाऊन स्टिल उघडे पडले आहे. तसेच पुलावर मोठे खड्डेही पडले आहेत.या पुलावरून जाताना लोक घाबरत आहेत परंतु दुसरा पर्याय नसल्याने या पुलाचा वापर करावा लागत आहे.

दिवसेंदिवस हा पुल कमकुवत बनत असुन आपत्ती काळात हा पुल केंव्हाही धोका देऊ शकतो. त्यामुळे बांधकाम विभागाने याचे गांभीर्य लक्षात घेऊन याचे स्ट्रक्चरल आँडिट करून योग्य ती कार्यवाही करणे गरजेचे आहे. आणि संभाव्य धोका टाळण्यासाठी प्रयत्न करणे आवश्यक आहे.

Web Title:  Dangerous bridge over Parley

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.