धोकादायक थांबा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 18, 2021 04:41 AM2021-05-18T04:41:01+5:302021-05-18T04:41:01+5:30

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने ...

Dangerous stop | धोकादायक थांबा

धोकादायक थांबा

Next

शिरवळ : पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावरच अनेक गाड्या प्रवाशांना घेण्यासाठी किंवा उतरवण्यासाठी थांबत असतात. वास्तविक पाहता महामार्गावर कोणत्याही प्रकारची वाहने उभी करू नयेत, असे संकेत आहेत. तरीही खासगी वाहने उभी केली जातात. त्यामुळे महामार्गावर अपघातांना निमंत्रण मिळत आहे. ते कोठे तरी थांबविण्याची गरज आहे.

0000000

पाणपोईची गरज

वडूज : खटाव तालुक्यात सूर्यनारायण आग ओक आहेत. त्यामुळे वातावरणात उकाडा जाणवत आहे. अंगातून घामाचा धारा लागत असल्याने नागरिकांना सतत तहान लागत आहे. विविध शासकीय कामानिमित्ताने ग्रामस्थ ग्रामीण भागातून येत वडूजला येत असतात. त्यांचे हाल होते. त्यामुळे सामाजिक संघटनांनी पुढाकार घेऊन सातारा शहरात पिण्याच्या पाण्यासाठी पाणपोई सुरू करावी, अशी मागणी ग्रामस्थांतून केली जात आहे.

00000000

बसस्थानक ओस

सातारा : जिल्ह्यात कोरोनाबाधित रुग्ण संख्या वाढत आहे. त्याचबरोबर उन्हाचा कडाकाही वाढत आहे. त्यामुळे नागरिक स्वत:हूनच घराबाहेर पडण्याचे टाळत असतात. त्यामुळे जिल्ह्यातील सर्वच बसस्थानकात शुकशुकाट जाणवत आहे. त्याचा परिणाम एसटीच्या फेऱ्यांवरही होत असल्याचे जाणवत आहे.

000000

पाण्याची सोय करावी

सातारा : जिल्हा परिषद प्राथमिक शाळा, माध्यमिक शाळांच्या समोर असलेल्या मैदानात कोरोनापूर्वी शोभेची झाडे, फुलझाडे लावली होती. त्यांची सेवकाकडून निगा राखली जात होती. मुले, शिक्षक पाणी घालत असत. कोरोनामुळे ते बंद आहेत. त्यामुळे झाडेही कोमेजू लागली आहेत. पाण्याची सोय करण्याची गरज आहे.

०००००

रात्रीचा रस्ते गजबजलेले

सातारा : कोरोनाबाधितांची साखळी तोडण्यासाठी जिल्हा प्रशासनान अनेक प्रकारे नियोजन करत आहे. रात्रीच्या वेळी संचारबंदी लागू केली आहे. त्यातून अत्यावश्यक सेवेला सवलत दिली आहे. तरीही रात्री अकरा वाजले तरी असंख्य सातारकर दुचाकीवरून फेरी मारत असतात.

-00000

टपालपेट्यांची गरज

सातारा : साताऱ्यात बहुमजली इमारती असतात. त्यामुळे त्या ठिकाणी टपालपेट्यांची नितांत गरज असते. पोस्टमनला प्रत्येक पत्रासाठी चौथ्या मजल्यावर जावे लागते. पोस्टमनला अवघड जात असल्याने पार्किंगमध्ये टपालपेट्या बसवाव्यात, अशी मागणी पोस्टमनकडून केली जाते. मात्र, ती पूर्ण होत नसल्याने पोस्टमन त्रस्त झाले आहेत.

00000

नळाच्या तोट्या गायब

सातारा : मार्च महिना संपत आला आहे. त्यामुळे उन्हाच्या झळा जाणवायला लागल्या आहेत. त्यामुळे पाण्याचे बाष्पीभवन वाढले असून पाणीसाठा आटत आहे. भविष्यात काही भागात पाण्याची टंचाई भासू शकते. मात्र, तरीही शहरातून अजूनही खबरदारी घेतली जात नाही. त्यामुळेच अनेक ठिकाणच्या नळाच्या तोट्या गायब झाल्या आहेत.

०००००००

यात्रा साध्या पद्धतीने

सातारा : जिल्ह्यातील गावोगावच्या यात्रांना प्रारंभ झाला आहे. मात्र, कोरोनाचा धोका कायम असल्याने साध्या पद्धतीने यात्रा साजऱ्या केल्या जात आहेत. घराच्या घरी कार्यक्रम साजरे होत आहेत. त्यामुळे यात्रेनिमित्ताने पै-पाहुणे, मित्रांसाठी आयोजित केल्या जाणाऱ्या जेवणावळ्या बंद झाल्या आहेत.

०००००

जिल्हा सीमा बंदच

सातारा : सातारा जिल्ह्यात कोरोनाचा शिरकाव वाढत असल्याने जिल्ह्याच्या सीमेवर तपासणी केली जात आहे. तरीही अन्य मार्गाने अनेकजण पुण्याहून अधिक प्रमाणात सातारकर येत असल्याने कोरोनाबाधितांची संख्या वाढत असण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

०००००००००००

फोटो सारांश

१७बॅरेकेट

वादळी वाऱ्याने बॅरेकेट पडले

सातारा : साताऱ्यात रविवारी सायंकाळी वादळी वाऱ्यासह मुसळधार पाऊस पडला आहे. यामुळे शहरातील अनेक ठिकाणी मालमत्तेचे मोठे नुकसान झाले आहे. मोती चौकातून राधिका रस्त्यावर जाणाऱ्या मार्गावर बॅरिकेड्‌स लावलेले असतात. ते वाऱ्याच्या वेगामुळे खाली पडले होते.

Web Title: Dangerous stop

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.