सातारा -फलटण रस्त्यावर धोकादायक वृक्ष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 25, 2021 04:43 AM2021-09-25T04:43:02+5:302021-09-25T04:43:02+5:30
आदर्की सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले जुनाट वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकातून ...
आदर्की
सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की बुद्रुक येथील रस्त्याला व वाहनाला अडथळा ठरत असलेले जुनाट वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकातून होत आहे.
सातारा-फलटण रस्त्यावर आदर्की फाटा ते फलटणदरम्यान संस्थानकाळात आंबा, चिंच, वड, पिंपरण आदी वृक्षाची लागवड केली होती. ती झाडे जुनी धोकादायक झाली आहेत. अशी धोकादायक झाडे सार्वजनिक बांधकाम विभागाच्या वतीने ठेकेदार काढतात. पण, ठेकेदार फायद्याची ठरणारी झाडे काढतात, अशी लिंबाची झाडे व फांद्या काढल्या आहेत. आदर्की बुद्रुक येथे पिंपरण व वडाची असे दोन वृक्ष धोकादायक स्थितीत आहेत. वडाच्या फांद्या रस्त्यावर आल्याने उंच ट्रक व उसाच्या ट्रॉली फांदीला धडकतात, तर एका वेळी दोन वाहने झाडाखाली आल्यास वाहनास फांद्या धडकतात. तरी अपघात होण्याअगोदर संबंधित विभागाने धोकादायक वृक्ष काढण्याची मागणी प्रवासी व वाहनधारकातून होत आहे.
आदर्की बुद्रुक ते कापशी दरम्यान अपघाती वळणावर वडाचे झाड जुने झाले असून, त्याच्या मोठ्या फांद्या रस्त्यावर आल्या आहेत. रोज उंच माल वाहतूक गाड्या धडकून येथे अपघात होत आहेत.
फोटो -धडकलेल्या ट्रक व वडाची फांदी.