कोपर्डे हवेलीत धोकादायक पाण्याची टाकी जमिनदोस्त

By admin | Published: July 17, 2017 02:35 PM2017-07-17T14:35:46+5:302017-07-17T14:35:46+5:30

ग्रामपंचायतीने चालवला बुलडोझर

Dangerous water cistern in the Koparde Haveli | कोपर्डे हवेलीत धोकादायक पाण्याची टाकी जमिनदोस्त

कोपर्डे हवेलीत धोकादायक पाण्याची टाकी जमिनदोस्त

Next

आॅनलाईन लोकमत

कोपर्डे हवेली : पिण्याच्या पाण्याची येथील जुनी साठवण टाकी कालबाह्य झाल्याने धोका टाळण्यासाठी ग्रामपंचायतीच्यावतीने ही टाकी जमिनदोस्त करण्यात आली. सध्या गावाला चोवीस तास योजनेच्या साठवण टाकीतून पाणी पुरवठा केला जात आहे.


कोपर्डे हवेली येथील जुनी नळ पाणी पुरवठा योजना १९८५ साली कार्यन्वित झाली होती. लोकसंख्याच्या तुलनेत ही योजना पुर्ण क्षमतेने पाणी पुरवठा करु शकत नव्हती. याशिवाय टाकीही धोकादायक बनली होती. टाकीच्या खांबाचे सिमेंट निघाले होते. लोखंडी सळ्या गंजल्या होत्या. ठिकठीकाणी गळती लागली होती. त्यामुळे टाकी कधीही कोसळेल, अशी परिस्थिती निर्माण झाली होती.

या टाकीनजीकच रस्ता असल्याने ग्रामस्थांची वर्दळ असायची. टाकी कोसळल्यास जिवितहानी होण्याची शक्यता असल्याने टाकी पाडण्याचे आदेश जिवन प्राधिकरणच्या कार्यकारी अभियंत्यांनी ग्रामपंचायतीला दिले होते. त्यानंतर काही दिवस ग्रामपंचायतीने टाकीला फलक लावुन सुरक्षात्मक उपाययोजना केली.

अखेर सोमवारी ग्रामपंचायतीने ही धोकादायक टाकी पाडली. तर ग्रामस्थांना पिण्याच्या पाण्याची अडचण निर्माण होवु नये, यासाठी चोवीस तास योजनेचे पाणी पुर्ण क्षमतेने देण्यास सुरवात केली आहे. चोवीस तास योजनेतील टाकीची साठवण क्षमता चार लाख लिटर असुन १ हजार २० ग्रामस्थांनी मिटर जोडणी करुन घेतली आहे. शुद्ध आणि मुबलक पाणी पुरवठा होत असल्याने ग्रामस्थांतुन समाधान व्यक्त होत आहे.



प्रतीमहिना पन्नास हजाराची बचत


जुन्या नळ पाणी पुरवठा योजनेला दोन वीज पंपांचा तर बेघर वसाहतीत एका पंपाचा वापर करण्यात येत होता. तिन्ही विज पंपाचे प्रती महिन्याचे बिल पन्नास हजार रुपए येत होते. सध्या हे विज पंप बंद झाल्याने आणि नविन योजना सुरू झाल्याने ग्रामपंचायतीची पन्नास हजार रूपयांची बचत होणार आहे.

Web Title: Dangerous water cistern in the Koparde Haveli

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.