धोकादायक विहिरींमुळे अपघाताला निमंत्रण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 9, 2021 04:33 AM2021-01-09T04:33:11+5:302021-01-09T04:33:11+5:30
कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी हे पूर्वेकडील कमी पावसाच्या विभागातील गाव आहे. सध्या कालव्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली ...
कऱ्हाड तालुक्यातील वाघेरी हे पूर्वेकडील कमी पावसाच्या विभागातील गाव आहे. सध्या कालव्यामुळे या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जाते. या गावाला दोन रस्ते आहेत. हे रस्ते कऱ्हाड ते पुसेसावळी या राज्यमार्गाला जोडले गेले आहेत. यापैकी बोरजाईमळा चौक ते पुसेसावळी या रस्त्यावर अनेक ठिकाणी खड्डे पडलेले आहेत. रस्ता प्रचंड खराब झाला असल्याने अपघात होण्याची शक्यता वाढत आहे. त्यातच या रस्त्याकडेला अनेक विहिरी आहेत. त्यापैकी पाच विहिरी तर रस्त्याला लागून आहेत. या विहिरींच्या काठावर झाडवेली उगवल्या आहेत. माहीतगार व्यक्तीशिवाय इतर कोणी साधी कल्पनाही करू शकत नाही की येथे विहीर असेल. या भागात मोठ्या प्रमाणावर ऊस शेती केली जात आहे. सध्या ऊसतोडणी हंगाम जोरात चालू आहे. या भागातील ऊस सह्याद्रीबरोबरच डोंगराई, वर्धन आणि जयवंत शुगर या कारखान्याला पुरवला जातो. ऊस घेऊन जाणारी वाहनेही याच रस्त्याचा वापर करतात. तसेच या परिसरातील वाघेरी, मेरवेवाडी आणि इतर गावांतील ग्रामस्थही याच रस्त्याचा वापर करतात.