नांदगणेत मुस्लिम समाजाकडून सामाजिक बांधिलकीचे दर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 22, 2021 04:41 AM2021-08-22T04:41:09+5:302021-08-22T04:41:09+5:30
कुडाळ : अतिवृष्टीमुळे जावळीतील केळघर भागातील गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेती, वीज, पाणी पुरवठा या साऱ्यांनाच याचा ...
कुडाळ : अतिवृष्टीमुळे जावळीतील केळघर भागातील गावांना अनेक समस्यांना सामोरे जावे लागले. शेती, वीज, पाणी पुरवठा या साऱ्यांनाच याचा फटका सहन करावा लागला. यातच नांदगणे येथील पाणी पुरवठा योजना गाडली गेल्याने पिण्याच्या पाण्याची टंचाई जाणवत होती. ग्रामस्थांची ही समस्या सोडविण्यासाठी खिदमत - ए - खल्क समिती व मुस्लिम समाजाने या गावाला पाणी पुरवठ्यासाठी आवश्यक साहित्य देऊन सामाजिक बांधिलकी जपत माणुसकीचे दर्शन घडवले आहे.
अतिवृष्टीमुळे नांदगणे गावात पिण्याच्या पाण्याची समस्या निर्माण झाली होती. येथील पाणी योजना गाडली गेल्याने टंचाई जाणवत होती. याबाबत सातारा येथील सातारा मुस्लिम जमातीचे अमीरसाब अनिसभाई तांबोळी यांनी येथील लोकांची समस्या सोडविण्यासाठी आवश्यक साहित्य देण्याचे ठरवले. त्यांच्या मार्गदर्शनानुसार खिदमत - ए - खल्क समिती व मेढा मुस्लिम समाजाच्यावतीने ६०० मीटर पाईप व पाणी साठविण्यासाठी टाकी देण्यात आली.
यावेळी गटविकास अधिकारी सतीश बुद्धे, विस्तार अधिकारी ए. पी. पवेकर, साजिदभाई शेख, सादिकभाई शेख, हाजी मोहसिन भाई बागवान, हाफिज मुराद, अज्जूभाई घड्याळवाले, आरिफ खान, तन्वीर शेख, इम्रान आतार, साजिद मुजावर, सत्तार पठाण, सादिक सय्यद, उपसरपंच जगन्नाथ दळवी, पोलीस पाटील विष्णू दळवी, अविनाश दळवी, श्रीरंग लोहार, महंमद पठाण, दत्ता लोहार, सतीश पार्टे, शांताराम दळवी, राजाराम दळवी आदी उपस्थित होते. संजय दळवी यांनी सूत्रसंचालन केले तर बापू उंबरकर यांनी आभार मानले.
२१ कुडाळ
फोटो - नांदगणे येथे खिदमत - ए - खल्क संस्थेच्यावतीने पाण्याची टाकी व पाईप सादिकभाई शेख यांनी दिले. यावेळी सतीश बुद्धे, साजिद शेख, हाजी मोहसिनभाई बागवान, हाफिज मुराद आदी उपस्थित होते.