लाचेची मागणी करणारे डीवाएसपी रुग्णालयात
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 20, 2019 11:41 AM2019-04-20T11:41:25+5:302019-04-20T11:42:51+5:30
फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
सातारा : फसवणूक प्रकरणात तडजोडीसाठी पावणे दोन लाखांची मागणी करणारे फलटणचे उपविभागीय पोलीस अधिकारी डॉ. अभिजित पाटील यांच्या छातीत दुखू लागल्याने त्यांना गुरुवारी रात्री उशिरा जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले.
याबाबत अधिक माहिती अशी, फलटण शहर पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल होता. या गुन्ह्यात तडजोड करून देतो, असे आमिष पोलीस उपअधीक्षक पाटील यांनी तक्रारदाराला दाखवले. सुरुवातीला अडीच लाख रुपयांच्या लाचेची मागणी त्यांनी केली. परंतु तक्रारदाराने एवढे पैसे नसल्याचे सांगितल्यानंतर पावणेदोन लाख रुपयांची तडजोड करण्याचे ठरले. लाचलुचपतच्या अधिकाºयांनी सापळा लावल्यानंतर पाटील यांना संशय आला. त्यामुळे त्यांनी रक्कम न स्वीकारताच तक्रारदाराला गाडीतून ढकलून दिले.
तसेच वॉईस रेकॉर्डर फेकून दिला. इकडे फलटण पोलीस ठाण्यात त्यांच्यावर गुन्हा दाखल झाल्यानंतर त्यांच्या छातीत दुखू लागले. त्यामुळे त्यांना गुरुवारी रात्री उशिरा सातारा येथील जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. वैद्यकीय अधिकाºयांच्या देखरेखीखाली त्यांच्यावर उपचार सुरू आहेत.