साताऱ्यात भरदिवसा चोरी, हिरेजडीत मंगळसूत्रही लंपास; एका महिलेविरोधात गुन्हा नोंद

By दत्ता यादव | Published: November 22, 2022 06:08 PM2022-11-22T18:08:08+5:302022-11-22T18:08:33+5:30

सातारा : सातारा शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. यामध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास झाला ...

Daytime theft in Satara, Mangalsutra also looted in Hirejdi; A case has been registered against a woman | साताऱ्यात भरदिवसा चोरी, हिरेजडीत मंगळसूत्रही लंपास; एका महिलेविरोधात गुन्हा नोंद

संग्रहित फोटो

Next

सातारा : सातारा शहरातील फॉरेस्ट कॉलनीतील एका घरातून सोन्याच्या दागिन्यांची चोरी झाली. यामध्ये सुमारे दीड लाखाचा ऐवज लंपास झाला असून, सातारा शहर पोलिस ठाण्यात एका महिलेविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, याप्रकरणी सुनीता गणपत भोसले (वय ७४, रा. फॉरेस्ट कॉलनी, गोडोली, सातारा) यांनी तक्रार दिली आहे. या तक्रारीनंतर दीपाली महेंद्र भंडारी (रा. विलासपूर, सातारा) या महिलेविरोधात गुन्हा नोंद झाला आहे.

पोलिसांनी सांगितले की, दि. १३ ऑक्टोबर रोजी सकाळी ११ ते साडेआकराच्या दरम्यान, तक्रारदार महिलेच्या घराच्या बेडरूमधून सोन्याचे दागिने नेण्यात आले. यामध्ये १२ ग्रॅम वजनाचे मिनी गंठन, दीड तोळ्याचे कानातील झुमके व साखळी आणि अर्धा तोळा वजनाचे हिरेजडीत मंगळसूत्रही लंपास केले. याप्रकरणी सातारा शहर पोलिस ठाण्यात नोंद झाली आहे. हवालदार मोहिते हे तपास करीत आहेत.

Web Title: Daytime theft in Satara, Mangalsutra also looted in Hirejdi; A case has been registered against a woman

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.