खंबाटकी घाटात विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, घात की अपघात चर्चेला उधाण

By ऑनलाइन लोकमत | Published: November 26, 2024 10:01 PM2024-11-26T22:01:03+5:302024-11-26T22:01:31+5:30

दरम्यान, संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून अन्य ठिकाणी घातपात करीत सेफ झोन मानल्या गेलेल्या डंपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.

dead body of a married woman was found in Khambatki Ghat, sparks the discussion of murder or accident | खंबाटकी घाटात विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, घात की अपघात चर्चेला उधाण

खंबाटकी घाटात विवाहितेचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ, घात की अपघात चर्चेला उधाण

मुराद पटेल -

पुणे-बंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंबाटकी घाटात बेंगरुटवाडी ता. खंडाळा गावच्या हद्दीत अंदाजे 28 ते 30 वयाच्या एका विवाहित युवतीचा मृतदेह आढळून आल्याने खळबळ उडाली आहे.दरम्यान, संबंधित युवतीचा घात की अपघात याबाबत चर्चेला उधाण आले असून अन्य ठिकाणी घातपात करीत सेफ झोन मानल्या गेलेल्या डंपिंग ग्राऊंड अर्थात खंबाटकी घाटामध्ये मृतदेह टाकून देण्यात आल्याची शक्यता खंडाळा पोलीसांकडून वर्तविण्यात येत आहे.

   बेंगरुटवाडी ता.खंडाळा गावच्या हद्दीत खंबाटकी घाटातील एक वळणालगत एक मालट्रक बंद पडल्याने संबंधित मालट्रकवरील चालक हे मालट्रक दुरुस्त करीत असताना व त्याठिकाणी दुरुस्तीकरीता यंञज्ञ येण्यासाठी उशिर लागणार असल्याने चालक कठड्याच्या बाजूला उग्र वास आल्याने चालकाचे खंबाटकी घाटातील दरीत लक्ष गेल्याने त्याठिकाणी एक महिलेचा मृतदेह दिसून आला असता तत्काळ खंडाळा पोलीसांशी संपर्क साधला.यावेळी घटनेची माहिती मिळताच घटनास्थळी खंडाळा पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक सुनिल शेळके,सहाय्यक पोलीस निरीक्षक संतोष म्हस्के व खंडाळा पोलीस,शिरवळ रेस्क्यू टिमच्या सहकार्याने मृतदेह दरीतून काढत खंडाळा येथील ग्रामीण रुग्णालयात आणण्यात आले.यावेळी घटनास्थळी अपर पोलीस अधिक्षक डाँ.वैशाली कडूकर,फलटण पोलीस उपविभागीय अधिकारी राहुल धस तसेच स्थानिक गुन्हे अन्वेषन विभागाच्या पथकाने भेट देत पाहणी केली,यावेळी संबंधित विवाहित युवतीच्या डोक्यात लोखंडी हत्याराने पाच ते सहा वार केले असल्याचे स्पष्ट झाले असून वार वर्मी बसल्याने मृत्यू झाल्याची शक्यता वर्तविण्यात येत आहे. या घटनेची नोंद करण्याचे काम उशिरापर्यंत खंडाळा पोलीस स्टेशनला सुरु होते.या घटनेचा पुढील तपास पोलीस निरीक्षक सुनिल शेळके हे करीत आहे.
छायाचिञ- खंबाटकी घाटात विवाहित युवतीचा मृतदेह टाकण्यात आला आहे.

Web Title: dead body of a married woman was found in Khambatki Ghat, sparks the discussion of murder or accident

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.