डोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्या

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: June 15, 2020 04:56 PM2020-06-15T16:56:33+5:302020-06-15T17:19:25+5:30

कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

Dead leopard found at the foot of the mountain | डोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्या

डोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्या

Next
ठळक मुद्देडोंगराच्या पायथ्याला आढळला मृत बिबट्याघारेवाडीतील घटना : न्यूमोनियाने तीन दिवसांपूर्वी मृत्यू

कुसूर/कऱ्हाड  : कऱ्हाड तालुक्यातील घारेवाडे येथील वनक्षेत्रालगत  कुजलेल्या अवस्थेत मृत बिबट्या आढळून आला. न्यूमोनिया आजाराने अथवा आतड्याच्या विकाराने त्याचा मृत्यू झाल्याचा प्राथमिक अंदाज वैद्यकीय अधिकाऱ्यांनी व्यक्त केला आहे.

घारेवाडी येथील वनक्षेत्रालगत दुतोंडी नावाच्या डोंगर पायथ्याला लांगड तळी नावाच्या शिवारात बिबट्या मरून पडल्याचे एका गुराख्याच्या निदर्शनास आले. गुराख्याने याबाबतची माहिती ग्रामपंचायत सदस्य मिलिंद बंडगर यांना दिली.

बंडगर यांनी वनरक्षक रमेश जाधवर यांना फोनवरून घटनेची माहिती दिली. उपवनसंरक्षक भारतसिंह हाडा यांच्या मार्गदर्शनाखाली सहायक वनसंरक्षक किरण कांबळे, वनक्षेत्रपाल विलास काळे, मानद वन्यजीव रक्षक भोईटे, मानद वन्यजीव रक्षक रोहण भाटे, पशुवैद्यकीय अधिकारी संजय हिंगमिरे, वनपाल सुभाष पाटील, वनरक्षक रमेश जाधवर, कविता रासवे, मंगेश वंजारी, वनमजूर अरुण शिबे आदींनी घटनास्थळी जाऊन पाहणी केली.

दोन ते अडीच वर्षांची मादी बिबट्या मृतावस्थेत पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. बिबट्याच्या नख्या, मिशा, दात व इतर सर्व अवयव सुस्थितीत होते. वैद्यकीय अधिकाऱ्यांनी तपासणी केली असता न्यूमोनियाने त्याचा मृत्यू झाला असल्याचा अंदाज व्यक्त केला. तीन ते चार दिवसांपूर्वी बिबट्याचा मृत्यू झाल्याची शक्यता आहे. रविवार सकाळी दहा वाजण्याच्या सुमारास शवविच्छेदन करण्यात आले. त्यानंतर जखिणवाडी बिटाअंतर्गत असलेल्या वनक्षेत्रात दहन करण्यात आले.

तिसऱ्या बिबट्याचा बळी

गत दोन वर्षांत याच वनक्षेत्रात बिबट्याचा मृत्यू झाल्याची ही तिसरी घटना आहे. गत दोन वर्षांपूर्वी कुसूर वनक्षेत्रामधील ह्यबिंदीह्ण नावाच्या शिवारात मृत बिबट्या आढळला होता. तर गतवर्षी अन्नाच्या शोधात आलेला बिबट्या बामणवाडी येथील भरवस्तीमधील विहिरीत पडून मृत पावला होता.

वनमजुरांचे अथक परिश्रम

घारेवाडी येथे सडलेल्या अवस्थेत सापडलेला मृत बिबट्या अडचणीतून बाहेर काढून गाडीत ठेवण्यापर्यंत अन्य कर्मचाऱ्यांसह वनमजूर अरुण शिबे यांनी मोठे परिश्रम घेतले. कोळे बिटाअंतर्गत असलेले वनमजूर अरुण शिबे हे तालुक्यातील अन्य बिटातील वनक्षेत्रात घडलेल्या प्रत्येक घटनेवेळी मोलाचे परिश्रम घेताना दिसतात.

 

Web Title: Dead leopard found at the foot of the mountain

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.