साठ कोंबड्यांच्या मृत्यूने पशुपालक हादरले!
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 17, 2021 04:33 AM2021-01-17T04:33:34+5:302021-01-17T04:33:34+5:30
लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले ...
लोणंद : खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी (कापरेवस्ती व शिंदेवस्ती) येथे अज्ञात आजाराने पन्नास ते साठ कोंबड्या दगावल्याने पशुपालक हादरले आहेत. यामुळे पशु वैद्यकीय विभाग सतर्क झाला असून कोंबड्यांना नक्की कोणता आजार झाला होता याचा अभ्यास करण्यासाठी मृत कोंबड्या व कावळ्यांचे नमुने पुण्यातील विभागीय प्रयोगशाळेला पाठविले आहेत. या अहवालाची सर्वांनाच प्रतीक्षा लागली आहे.
मरिआईचीवाडी परिसरात कोंबड्यांचा मृत्यू झाल्याचे समजल्यानंतर अज्ञात रोगाचा प्रसार जिल्ह्यात इतर ठिकाणी होऊ नये यासाठी मृत सापडलेल्या कोंबड्यांच्या परिसरात सोडियम हायफोक्लोराईची फवारणी करण्यात आली. परिसरातील पोल्ट्री फार्मची पाहणी करून मोकळ्या जागेत मोठ्या प्रमाणावर ज्यांनी कुक्कुटपालनाचा व्यवसाय केला आहे. त्या ठिकाणच्या पक्ष्यांच्या रक्तांचे नमुने घेण्याचे काम लोणंद येथील पशुवैद्यकीय अधिकारी डॉ. किशोर मुळे, डॉ. दयाराम सूर्यवंशी, डॉ. पवण सूर्यवंशी यांच्या उपस्थितीत सुरू होते. यावेळी सर्व पोल्ट्रीधारकांना स्वच्छतेबाबतच्या सूचना देण्यात आल्या.
चौकट
पशुपक्षी वाहतुकीस बंदी
प्रभावित क्षेत्रात जिवंत व मृत कुक्कुट पक्षी, अंडी, कोंबडीखत, पक्षीखाद्य, अनुषंगिक साहित्य व उपकरणास वाहतुकीस मनाई करण्यात येत आहे. प्रभावित पोल्ट्री फार्मच्या परिसरात नागरिकांच्या हालचालीस तसेच इतर पक्षी आणि प्राण्यांच्या वाहतुकीस प्रतिबंध करण्यात येत असल्याचे जिल्हाधिकारी यांनी आदेश काढले आहेत. याबाबतची अंमलबजावणी करण्यात येत आहे.
चौकट...
कावळ्यांचा संशयास्पद मृत्यू
लोणंदच्या प्राथमिक आरोग्य केंद्र परिसरामध्ये दोन दिवसांपूर्वी तीन मृत कावळे, इतर दोन पक्षी सापडले आहेत. या पाचही मृत पक्ष्यांच्या मृत्यूचे कारण शोधण्यासाठी पुणे येथील विभागीय प्रयोगशाळेत नमुने पाठविण्यात आले आहे.
कोट...
२००६ पासूनच्या बर्ड फ्लूचा फटका मानवास बसलेला नाही. त्यामुळे नागरिकांनी याबाबत घाबरून जाऊ नये.
- डॉ. दयाराम सूर्यवंशी.
फोटो
१६लोणंद-बर्ड फ्लू
खंडाळा तालुक्यातील मरिआईचीवाडी येथे कोंबड्या मृत्युमुखी पडल्यानंतर पशुसंवर्धन विभागाने जंतुनाशकाची फवारणी सुरू केली. (छाया : संतोष खरात)