जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2021 04:38 AM2021-01-20T04:38:58+5:302021-01-20T04:38:58+5:30

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याजवळ जखमी अवस्थेत सापडलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली ...

Death during treatment of injuries | जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

जखमीचा उपचारादरम्यान मृत्यू

Next

खंडाळा : पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळ्याजवळ जखमी अवस्थेत सापडलेल्या पुरुषाचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. याची नोंद खंडाळा पोलीस ठाण्यात झाली आहे.

याबाबत खंडाळा पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, पुणे-बेंगलोर राष्ट्रीय महामार्गावर खंडाळा येथील जुन्या टोलनाक्याजवळ सातारा-पुणे रस्त्याजवळ गुरुवार, दि. ७ रोजी रात्री नऊच्यासुमारास पुरुष जखमी अवस्थेत पोलिसांना मिळून आला होता. जखमीवर पारगाव येथील मानसी हॉस्पिटलमध्ये प्राथमिक उपचार करण्यात आले. अधिक उपचारार्थ सातारा जिल्हा रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र उपचारादरम्यान त्याचा मृत्यू झाला.

संबंधित व्यक्ती अंदाजे ४५ वर्षीय असून, चेहरा उभट, सरळ नाक, डोके व दाढी-मिशांचे केस पांढरे, निळसर जांभळ्या रंगाचा फूल बाह्यांचा शर्ट व खाकी रंगाची पॅन्ट असा पेहराव आहे. याविषयी कोणास माहिती असल्यास खंडाळा पोलीस ठाण्याशी संपर्क साधावा, असे आवाहन पोलीस निरीक्षक महेश इंगळे यांनी केले आहे.

Web Title: Death during treatment of injuries

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.