चोरजवाडीत मरणासन्न स्थितीत आढळलेल्या बिबट्याला जीवदान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 30, 2018 09:15 PM2018-09-30T21:15:34+5:302018-09-30T21:15:37+5:30

Death of a leopard found in Chorajwadi | चोरजवाडीत मरणासन्न स्थितीत आढळलेल्या बिबट्याला जीवदान

चोरजवाडीत मरणासन्न स्थितीत आढळलेल्या बिबट्याला जीवदान

Next

उंब्रज : कºहाड तालुक्यातील चोरजवाडी येथील वनविभागाच्या हद्दीत शनिवारी रात्री बिबट्या निपचित अवस्थेत आढळून आला. वनविभागाच्या अधिकारी व प्राणीमित्रांनी तातडीने भर पावसात घटनास्थळी धाव घेतली. तातडीने उपचार केल्यामुळे त्याला जीवदान मिळाले.
चोरजवाडी गावानजीक असलेल्या डोंगराच्या पायथ्याला ओढ्यालगत शनिवारी रात्री आठ वाजता बिबट्या तडफडत पडला होता. ही घटना एका शेतकऱ्याने पाहिली. त्याने त्याबाबतची माहिती वनक्षेत्रपाल डॉ. अजित साजणे यांना फोनवरून दिली. वनक्षेत्रपाल साजणे यांनी तातडीने वनविभागाच्या बीट गार्डला बिबट्या असलेल्या ठिकाणी पाठवले. तेथील परिस्थितीची फोनवरूनच माहिती घेतली. बिबट्या तडफडत असल्याचे गार्डने वनक्षेत्रपाल साजणे यांना सांगितले. त्यानंतर स्वत: वनक्षेत्रपाल साजणे घटनास्थळी पोहोचले.
बिबट्याला सुरक्षित पकडणे आणि त्याच्यावर उपचार करणे गरजेचे असल्याचे वनाधिकाºयांच्या निदर्शनास आले. त्यानंतर त्यांनी बिबट्याला पकडण्याची मोहीम सुरू केली. पहाटे बिबट्याला पकडण्यात यश आले. त्यानंतर त्याला उचलून वनविभागाच्या गाडीतून सुरक्षित ठिकाणी नेण्यात आले. त्याठिकाणी उपचार केल्यानंतर काही तासांनी बिबट्याच्या प्र्रकृतीत सुधारणा होत असल्याचे दिसून आले. सध्या बिबट्या वन विभागाच्या देखरेखीखाली सुरक्षित ठिकाणी ठेवण्यात आला आहे. तसेच त्याच्यावर उपचार सुरू असून, प्र्रकृती सुधारल्यानंतर त्याला वन अधिवासात सोडण्यात येणार असल्याची माहिती वनक्षेत्रपाल साजणे यांनी दिली.

उपासमारीमुळे प्रकृती बिघडली
चोरजवाडी येथे डोंगर पायथ्याला ओढ्यालगत आढळलेल्या बिबट्याची वैद्यकीय अधिकाºयांनी तपासणी केली. त्यावेळी त्याच्या पोटात अन्न नसल्याचे समोर आले. उपासमारीमुळे त्याची ही परिस्थिती झाली असावी, असा वैद्यकीय अधिकाºयांचा कयास आहे. संबंधित बिबट्या दोन वर्षांचा नर असून, अद्याप त्याची पूर्ण वाढ झालेली नाही.
 

 

Web Title: Death of a leopard found in Chorajwadi

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.