साखरपुड्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू

By Admin | Published: February 13, 2015 10:37 PM2015-02-13T22:37:05+5:302015-02-13T22:54:17+5:30

खिंडवाडी येथील घटना : ट्रकला कंटेनरची पाठीमागून धडक

Death of Lord Narveer before sugar mills | साखरपुड्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू

साखरपुड्यापूर्वीच नवरदेवाचा मृत्यू

googlenewsNext

सातारा : साखरपुड्यासाठी गावी निघालेल्या कर्नाटक येथील नवरदेवाचा खिंडवाडी येथे शुक्रवारी सकाळी दुर्दैवी अपघाती मृत्यू झाला. रस्त्याकडेला उभ्या असलेल्या ट्रकला कंटेनरने पाठीमागून जोरदार धडक दिल्याने हा भीषण अपघात झाला.
धवलसाहब कासमसाहब कुंभार (वय २७, रा. आधरगंज, ता. हुबळी, जि. धारवाड, कर्नाटक) असे ठार झालेल्या नवरदेवाचे नाव आहे. याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, धवलसाहब हा कर्नाटक येथील कंटेनरवर (केए ५१ बी ११४४) चालक म्हणून काम करीत होता. काही दिवसांपूर्वी त्याचे कर्नाटक येथील एका मुलीशी लग्न ठरले होते. रविवारी त्याचा साखरपुडा होता. त्यामुळे त्याने कर्नाटकला माल घेऊन जातो, असे मालकाला सांगितले. त्याचा साखरपुडा असल्याने मालकानेही त्याला परवानगी दिली.
पुण्याहून शुक्रवारी मध्यरात्री धवलसाहब आणि क्लिनर कंटेनर घेऊन कर्नाटककडे रवाना झाले. सकाळी पावणेसातच्या सुमारास ते खिंडवाडीजवळ आले. त्यावेळी रस्त्याच्या कडेला मालट्रक (एमएच ०९ सीए ४४७१) थांबला होता. यावेळी धवलसाहबचा कंटेनरवरचा अचानक ताबा सुटल्याने कंटेनर ट्रकवर पाठीमागून जोरदार आदळला. हा अपघात एवढा भीषण होता की, ट्रक आणि कंटेनरचा भाग एकमेकांत अडकला. त्यामुळे चालक धवलसाहब याचा जागीच मृत्यू झाला.
अपघातानंतर महामार्गावर वाहतूक ठप्प झाली होती. जखमींना बाहेर काढण्यासाठी कोणीही पुढे आले नाही. औद्योगिक वसाहत पोलीस चौकीचे सहायक पोलीस निरीक्षक एम. यू. वैराटकर, हवालदार बशीर मुलाणी, प्रशांत शेवाळे, मदन मुळे यांना या घटनेची माहिती मिळाल्यानंतर त्यांनी तत्काळ घटनास्थळी धाव घेतली.
सुमारे अर्ध्या तासाच्या अथक प्रयत्नानंतर चालक धवलसाहब याला कंटेनरमधून मृतावस्थेत पोलिसांनी बाहेर काढले. त्यानंतर त्याचा मृतदेह
जिल्हा रुग्णालयात शवविच्छेदनासाठी नेण्यात आला. त्याच्यासोबत असलेला क्लिनर मात्र किरकोळ जखमी झाला. (प्रतिनिधी)

Web Title: Death of Lord Narveer before sugar mills

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.