कोरोनाने मित्र हिरावला... मित्रांनी त्याचा संसार सावरला!, कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दिली गिरण

By ऑनलाइन लोकमत | Published: May 31, 2022 04:07 PM2022-05-31T16:07:44+5:302022-05-31T16:08:25+5:30

संभाजी हिंगणेच्या १९९२ च्या दहावी बॅचचे मित्र धावून आले. ‘१९९२ बॅचची आठवण मैत्रीची’ या नावाने एक ग्रुप कार्यरत आहे. त्यावर सर्वांना मदत करण्यास सांगितले. बघता बघता ५० हजार रुपयेचा निधी गोळा झाला. परंतु नुसते पैसे देऊन त्यांचा आयुष्यभराचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून या ग्रुपने त्यांना मासिक कमाई व्हावी या दृष्टीने एक पिठाची गिरणी देण्याचा मानस केला.

Death of Sambhaji Hingane and Tanaji Hingane, Friends of SSC came together and helped the family | कोरोनाने मित्र हिरावला... मित्रांनी त्याचा संसार सावरला!, कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दिली गिरण

कोरोनाने मित्र हिरावला... मित्रांनी त्याचा संसार सावरला!, कुटुंबाला उदरनिर्वाहासाठी दिली गिरण

Next

पांडुरंग भिलारे

वाई : कोरोनाने जगाला भरपूर काही गमवायला भाग पाडले. अशीच घटना वाईमध्ये घडली. सुतार काम करणारे संभाजी हिंगणे व त्यांचे धाकटे बंधू तानाजी हिंगणे यांच्यावर नियतीचा घाला घातला. आई-वडील, संभाजी व तानाजी त्यांच्या पत्नी, दोघांनाही दोन-दोन मुले असे एकूण दहा माणसांचे एकत्र कुटुंब. कर्ती माणसं गेल्याने कुटुंबावर संकट कोसळले. या कुटुंबाला दहावीतील मित्रांनी मदतीचा हात देऊन  सावरण्यासाठी आधार दिला.

एक वर्षापूर्वी हे संपूर्ण कुटुंब कोरोनाच्या विळख्यात अडकले. १६ मे २०२१ रोजी तानाजी हिंगणे याला कोरोनाने गाठले. बरेच उपचार घेऊनही तो घरच्यांच्या हाती लागला नाही. हे होत असतानाच मोठा भाऊ संभाजी हिंगणे हाही कोरोनाच्या विळख्यात अडकला. त्याच्यावरही बरेच उपचार केले. परंतु शेवटी त्यानेही अगदी एकाच आठवड्यात २६ मे २०२१ रोजी सर्वांना सोडून जगाचा निरोप घेतला. दोघांच्याही दवाखान्यासाठी घरात होता नव्हता तो पैसा गेला आणि उघडे पडले ते अख्खे कुटुंब.

अशावेळी संभाजी हिंगणेच्या १९९२ च्या दहावी बॅचचे मित्र धावून आले. ‘१९९२ बॅचची आठवण मैत्रीची’ या नावाने एक ग्रुप कार्यरत आहे. गेट-टुगेदर करता-करता बरेचसे सामाजिक उपक्रम करण्यात यांचा खारीचा वाटा असतो. संभाजी व त्याच्या घरच्यांबद्दल माहिती मित्रांना समजली तेव्हा त्यांनी मदतीचा हात म्हणून लगेच एक झूम मीटिंग आयोजित केली. त्यावर सर्वांना मदत करण्यास सांगितले. बघता बघता ५० हजार रुपयेचा निधी गोळा झाला. हे सर्व पैसे संभाजीच्या कुटुंबाला देण्यासाठी जमा झाले. परंतु नुसते पैसे देऊन त्यांचा आयुष्यभराचा पोटापाण्याचा प्रश्न सुटणार नव्हता. म्हणून या ग्रुपने त्यांना मासिक कमाई व्हावी या दृष्टीने एक पिठाची गिरणी देण्याचा मानस केला.

दोन महिन्यांतच त्यांच्या घरच्यांना पिठाची गिरणी उपलब्ध करून त्याचे पूर्ण काम करून बसवून दिली. राहिलेले तीस हजार रुपये काही अनपेक्षित अडचणी दिसल्यामुळे थांबवण्यात आले. परंतु सर्व स्थिरस्थावर झाल्यावर ते २५ मे रोजी त्यांच्या आईच्या व पत्नीच्या नावे फिक्स डिपॉझिट स्वरूपामध्ये त्यांना देण्यात आले.

विधवा स्त्रियांना शिलाई मशीन

एक संघटन काय करू शकते, याचे जिवंत उदाहरण आज यांच्या एकजुटीमुळे यांनी समाजाला दाखवून आदर्श निर्माण केला. मध्यंतरी याच ग्रुपने रोटरी क्लब ऑफ वाईबरोबर काम केले. कोरोना काळामध्ये गेलेल्या पुरुषांच्या विधवा स्त्रियांना सहा शिलाई मशीनचे वाटप करून उल्लेखनीय काम केले.

Web Title: Death of Sambhaji Hingane and Tanaji Hingane, Friends of SSC came together and helped the family

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.