साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु
By दत्ता यादव | Updated: February 25, 2025 14:40 IST2025-02-25T14:40:00+5:302025-02-25T14:40:19+5:30
सातारा : राहत्या घरातील गॅलरीतून पडून एका नववीतील मुलाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २४ रोजी घडली. ...

साताऱ्यात गॅलरीतून पडून शाळकरी मुलाचा मृत्यू, घात की अपघात.. तपास सुरु
सातारा : राहत्या घरातील गॅलरीतून पडून एका नववीतील मुलाचा खासगी रुग्णालयात उपचारादरम्यान मृत्यू झाला. ही घटना सोमवार, दि. २४ रोजी घडली. वरद पोपट चव्हाण (वय १४, कूपर कॉलनी, सदर बझार, सातारा), असे मृत्यू झालेल्या शाळकरी मुलाचे नाव आहे.
वरद चव्हाण हा घरात झोपला होता. दि. १८ रोजी सकाळी सहा वाजता तो गॅलरीतून अचानक खाली पडला. बेशुद्ध अवस्थेत तो घरातल्यांच्या निदर्शनास आला. यानंतर त्याला तातडीने साताऱ्यातील खासगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. मात्र, सोमवार, दि. २४ रोजी त्याचा उपचारादरम्यान मृत्यू झाला. वरद हा साताऱ्यातील एका इंग्रजी माध्यमाच्या शाळेत नववी इयत्तेत शिकत होता.
या घटनेची माहिती सातारा शहर पोलिस ठाण्यातील पोलिस निरीक्षक सुधीर मोरे यांना मिळाल्यानंतर ते आपल्या सहकाऱ्यांसह घटनास्थळी पोहोचले. वरद नेमका कसा पडला, हे घरातल्यांनाही माहिती नसल्याचे पोलिस सांगतायत. त्याच्यावर अत्यंविधी झाल्यानंतर पोलिस घरातल्यांकडे याबाबत माहिती घेणार आहेत. सातारा शहर पोलिस ठाण्यात या घटनेची नोंद झाली आहे.