corona virus : जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच; आणखी १७ जणांचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 11, 2020 03:02 PM2020-09-11T15:02:19+5:302020-09-11T15:09:50+5:30
सातारा जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, शुक्रवारी आणखी १७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ५९९ वर पोहचला आहे.
सातारा: जिल्ह्यात कोरोना बाधितांचे मृत्यूसत्र सुरूच असून, शुक्रवारी आणखी १७ जणांचा कोरोनामुळे बळी गेला. यामुळे बळींचा आकडा आता ५९९ वर पोहचला आहे.
जिल्हात गुरुवारी रात्री ८०० जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यात १७ जणांचा मृत्यू झाला. त्यामध्ये खोजेवाडी, सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, माजगावकर मळा सातारा येथील ६५ वर्षीय महिला, धोडशी, ता. कराड येथील ६५ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.
पानमळेवाडी, ता. सातारा येथील ७८ वर्षीय पुरुष, वाई येथील ५५ वर्षीय पुरुष, पंचशिलनगर, ता. खंडाळा येथील ५० वर्षीय पुरुष, मोरघर, ता. जावली येथील ६५ वर्षीय पुरुष, सातारा येथील ५० वर्षीय पुरुष, शनिवार पेठ सातारा येथील ६० वर्षीय पुरुष, तसेच सायगाव, ता. जावली येथील ५६ वर्षीय पुरुष, खेड मालवी सातारा येथील ५२ वर्षीय पुरुष, अंबवडे, ता. खटाव येथील ५७ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे.
जाखनगाव, ता. खटाव येथील ६९ वर्षीय पुरुष, शिवाजीनगर फलटण येथील ७० वर्षीय महिला, सावडे, कराड येथील ७० वर्षीय पुरुष, दौलत कॉलनी शनिवार पेठ कराड येथील ५६ वर्षीय महिला, ओंड येथील ५७ वर्षीय महिलेचा मृतांमध्ये समावेश आहे. दरम्यान, जिल्ह्यात आतापर्यंत २२ हजार १४७ कोरोना बाधित रुग्ण आढळून आले आहेत. तर १२ हजार १८९ रुग्ण कोरोनामुक्त झाले आहेत.