जिल्ह्यात मृत्यूसत्र सुरूच; आणखी २० जणांचा कोरोनामुळे बळी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 1, 2020 05:40 PM2020-10-01T17:40:13+5:302020-10-01T17:42:09+5:30
Death season continues, satara district, Another 20 killed by corona सातारा जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या वाढत असून, गुरुवारी आणखी २० जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार १६० वर पोहचली असून, जिल्ह्याचा मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
सातारा: जिल्ह्यात कोरोनाच्या बळींची संख्या वाढत असून, गुरुवारी आणखी २० जणांचा मृत्यू झाला. यामुळे बळींची संख्या १ हजार १६० वर पोहचली असून, जिल्ह्याचा मृत्यू दर वाढत असल्याने चिंता व्यक्त होऊ लागली आहे.
जिल्ह्यात बुधवारी रात्री ५१२ जणांचे अहवाल कोरोना बाधित आले. यामध्ये २० जणांचा मृत्यू झाला आहे. मृतामध्ये गोडोली सातारा येथील ६६ वर्षीय पुरुष, सासपडे, (ता. सातारा) येथील ७६ वर्षीय महिला, कोळोशी अंबवडे, (ता. सातारा) येथील ९६ वर्षीय महिला, बोपर्डी, (ता. वाई) येथील ४५ वर्षीय पुरुष, तारळे, (ता. पाटण) येथील ७० वर्षीय महिला, पांडे,(ता. वाई) येथील ८० वर्षीय पुरुष, पाल सातारा येथील ८३ वर्षीय पुरुष, बेबलेवाडी, (ता. सातारा) येथील ६३ वर्षीय महिला, पारगाव येथील ७० वर्षीय पुरुष, बुधवार पेठ सातारा येथील ६५ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
मल्हार पेठ सातारा येथील ६५ वर्षीय पुरुष, बुधवार पेठ फलटण येथील ५२ वर्षीय पुरुष, कुडाळ, (ता. जावली) येथील ६५ वर्षीय महिला, कुळकजाई, (ता. माण) येथील ६९ वर्षीय महिला, वाडोली, (ता. कराड) येथील ६३ वर्षीय पुरुष, लवंगमाची वाळवा जि. सांगली येथील ६२ वर्षीय पुरुष, गुलमोहर कॉलनी सातारा येथील ६९ वर्षीय महिला, शनिवार पेठ कऱ्हाड येथील ६५ वर्षीय पुरुष, येवती कऱ्हाड येथील ३४ वर्षीय पुरुष, उंब्रज, (ता. कऱ्हाड) येथील ६२ वर्षीय पुरुषाचा समावेश आहे.
दरम्यान, जिल्ह्यात आत्तापर्यंत ३७ हजार ८१२ बाधित रुग्ण आढळून आले असून, यापैकी ११६० जणांचा मृत्यू झाला आहे. तसेच आतापर्यंत २७ हजार ४५८ रुग्णांनी कोरोनावर मात केली आहे.