चोरी करायला आलेल्याचा हृदयविकाराने मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 29, 2017 04:37 AM2017-11-29T04:37:08+5:302017-11-29T04:37:21+5:30
बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला. मृतदेह त्याच ठिकाणी सोडून त्याचे साथीदार पसार झाले.
क-हाड (जि. सातारा) : बंगल्यात चोरी करायला गेलेल्या चोरट्याचा त्याच ठिकाणी हृदयविकाराने मृत्यू झाला. मृतदेह त्याच ठिकाणी सोडून त्याचे साथीदार पसार झाले. क-हाडनजीक गजानन हाउसिंग सोसायटीमध्ये घडलेली ही घटना मंगळवारी सकाळी १०च्या सुमारास उघडकीस आली.
गजानन हाउसिंग सोसायटीमध्ये जयराम जोशी यांचा बंगला आहे. जोशी हे पॉलिश पेपरचे पश्चिम महाराष्ट्रातील मुख्य वितरक असून, बंगल्यातच त्यांनी गोदाम व त्यांचे कार्यालय सुरू केले आहे. बंगल्यात कोणीही वास्तव्यास नसते. मंगळवारी सकाळी जोशी नेहमीप्रमाणे बंगल्यात आले असता व्हरांड्यात कोणीतरी अस्ताव्यस्त पडल्याचे त्यांच्या निदर्शनास आले. त्यांनी जवळ जाऊन पाहिले असता संबंधिताचा मृत्यू झाल्याचे त्यांना समजले.
जोशी यांनी पोलिसांत माहिती दिली. पोलिसांनी बंगल्याचा मुख्य दरवाजा कटावणीने उचकटल्याचे दिसून आले. पहिल्या मजल्यावरील कार्यालयाचा दरवाजाही कटावणीने उचकटण्याचा प्रयत्न झाल्याचे दिसून येत
होते.
बंगल्याच्या पोर्चमध्ये मृतावस्थेत पडलेल्या व्यक्तीचा हृदयविकाराने मृत्यू झाल्याची शक्यता वैद्यकीय अधिकाºयांनी व्यक्त केली आहे. संबंधित व्यक्ती चोर असावी, असा पोलिसांचा कयास आहे.