विठ्ठलराव रणवरे यांचे निधन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 13, 2021 04:39 AM2021-05-13T04:39:58+5:302021-05-13T04:39:58+5:30

जिंती : फलटण तालुक्यातील जिंती येथील विठ्ठलराव यशवंतराव रणवरे (वय ६६) यांचे निधन झाले. जिंती गावचे प्रगतशील बागायतदार म्हणून ...

Death of Vitthalrao Ranavare | विठ्ठलराव रणवरे यांचे निधन

विठ्ठलराव रणवरे यांचे निधन

Next

जिंती : फलटण तालुक्यातील जिंती येथील विठ्ठलराव यशवंतराव रणवरे (वय ६६) यांचे निधन झाले. जिंती गावचे प्रगतशील बागायतदार म्हणून त्यांची ओळख होती. त्यांच्या पश्चात आई, वडील, तीन मुले, मुलगी, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १२ विठ्ठलराव रणवरे

नंदकुमार भोंडवे

पुसेगाव : नंदकुमार जोती भोंडवे (वय ५३) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा व मुलगी, आई व भावंडे असा परिवार आहे. ते पतसंस्थेत रोखपाल म्हणून कार्यरत होते.

फोटो : १२ नंदकुमार भोंडवे

अनुसया तपकिरे

वाई : बिदाल येथील अनुसया नारायण तपकिरे (वय ९०) यांचे अल्पशा आजाराने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, दोन मुली, सुना, जावई, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १२ अनुसया तपकीरे

उत्तम बोर्गे

खटाव : खटाव ग्रामपंचायतीचे विद्यमान सदस्य उत्तम महादेव बोर्गे (वय ६६) यांचे निधन झाले. त्यांच्या पश्चात पत्नी, मुलगा, मुलगी, सून, नातवंडे असा परिवार आहे.

फोटो : १२ उत्तम बोर्गे

भागिर्थी पवार

आदर्की : फलटण तालुक्यातील वाघोशी येथील भागिर्थी गुलाबराव पवार (वय ८५) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात विवाहित मुलगा, पाच विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. वाघोशी-कोऱ्हाळे विविध कार्यकारी सोसायटीचे माजी चेअरमन हणमंतराव पवार यांच्या त्या मातोश्री होत.

फोटो : ११ भागिर्थी पवार

महादेव वाघ

औंध : गुरसाळे येथील सेवानिवृत्त ग्रामसेवक महादेव विठ्ठल वाघल (वय १००) यांचे वृद्धापकाळाने निधन झाले. त्यांच्या पश्चात मुलगा, तीन विवाहित मुली, सुना, नातवंडे असा परिवार आहे. ते सेवानिवृत्त प्राथमिक शिक्षक व विकास सोसायटीचे संचालक बळीराम वाघ यांचे वडील, तर माजी सरपंच विमल वाघ यांचे सासरे होत.

फोटो : ११ महादेव वाघ

Web Title: Death of Vitthalrao Ranavare

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.