अनेक दशकांनंतर ते एकमेकांना भेटले

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 16, 2021 04:42 AM2021-01-16T04:42:55+5:302021-01-16T04:42:55+5:30

सातारा : अनेक दशकांच्या खंडानंतर ते एकमेकांना भेटले. प्रत्येकजण एकमेकाला अंदाजानेच हाक मारत होता. कुणाचे केस पांढरे झाले होते, ...

Decades later, they met | अनेक दशकांनंतर ते एकमेकांना भेटले

अनेक दशकांनंतर ते एकमेकांना भेटले

Next

सातारा : अनेक दशकांच्या खंडानंतर ते एकमेकांना भेटले. प्रत्येकजण एकमेकाला अंदाजानेच हाक मारत होता. कुणाचे केस पांढरे झाले होते, तर कुणाच्या डोक्यावर पूर्णपणे टक्कल पडले होते. स्वत: आजी-आजोबा, तर काहीजण आई-बाबा झाल्यानंतरही आपल्या शाळेतील मित्र-मैत्रिणींना आणि शिक्षकांना पाहून आनंदून जात होते. निमित्त होते शिक्षण मंडळ कऱ्हाड या संस्थेच्या कोल्हापुरात राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांच्या मेळाव्याचे.

शिक्षण मंडळ कऱ्हाड या संस्थेचे २०२०-२०२१ हे शताब्दी वर्ष. यानिमित्त संस्थेच्या अनेक माजी विद्यार्थिनी व विद्यार्थ्यांनी विभागवार मेळावे आयोजित केले आहेत. यातील पहिला मेळावा कोल्हापूर येथे शिवाजी पेठेतील शिवाजी तरुण मंडळाच्या सभागृहात रविवार, दि १० जानेवारी रोजी पार पडला. या कार्यक्रमाचे निमंत्रक होते योगिता पाटील, पल्लवी कुलकर्णी, मेधा कुलकर्णी, विनय तोडकर आणि ज्ञानेश्वर भिसे हे माजी विद्यार्थी विद्यार्थिनी.

रांगोळी, सनईचे सूर आणि मित्र-मैत्रिणींच्या भेटीगाठी या भारलेल्या वातावरणातच स्वप्ना, योगिता आणि मेधा यांनी शाळेची प्रार्थना म्हणून कार्यक्रमाचा प्रारंभ केला. सरस्वती वंदनेबरोबरच पल्लवी कुलकर्णी यांनी कॅनव्हासवर अ‍ॅक्रेलिक कलरने देवीचे पेंटिंग रेखाटले. माजी विद्यार्थी, विद्यार्थिनी यांनी ते संस्थेस भेट दिले. नलिनी जुगारे व ज्ञानेश्वर भिसे यांनी तत्कालीन शिक्षकांच्या आठवणी जागविल्या.

शताब्दी महोत्सवाचे समन्वयक राजेंद्र लाटकर यांनी संस्थेच्या कार्याविषयी थोडक्यात माहिती दिली व शताब्दी महोत्सवाच्या पुढील कार्यासाठी दिशादर्शन केले. विद्यार्थिनीप्रिय शिक्षिका अनघा परांडकर यांनीही मार्गदर्शनपर भाषण केले. यानंतर अध्यक्ष सदानंद चिंगळे यांनी संस्थेच्या पुढील विस्तारासंबंधी माहिती दिली.

तृप्ती पालेकर-कुलकर्णी व ज्ञानेश्वर भिसे यांनी कार्यक्रमाचे सूत्रसंचालन केले, तर मेधा कुलकर्णी यांनी आभार मानले. सर्व माजी विद्यार्थ्यांकडून संस्थेला पूर्ण सहकार्याचे आश्वासन दिले.

फोटो : १५ एज्युकेशन

शिक्षण मंडळ कऱ्हाड येथे कोल्हापुरात राहणाऱ्या माजी विद्यार्थ्यांचा स्नेहमेळावा उत्साहात पार पडला.

Web Title: Decades later, they met

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.