रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 3, 2021 04:35 AM2021-04-03T04:35:18+5:302021-04-03T04:35:18+5:30

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना ...

Decision to increase the crushing capacity of Rayat factory | रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

रयत कारखान्याची गाळप क्षमता वाढविण्याचा निर्णय

Next

ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर हे सभेच्या अध्यक्षस्थानी होते. यावेळी उपाध्यक्ष आप्पासाहेब गरुड, अथणी - रयतचे युनिट प्रमुख रवींद्र देशमुख, कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष वसंतराव जगदाळे, कराड तालुका खरेदी-विक्री संघाचे अध्यक्ष रंगराव थोरात, शेती उत्पन्न बाजार समितीचे सभापती महादेव देसाई, कोयना बँकेचे अध्यक्ष रोहित पाटील, शामराव पाटील पतसंस्थेचे अध्यक्ष ब. ल. पाटील, हणमंतराव चव्हाण यांची प्रमुख उपस्थिती होती.

सभेत विषयपत्रिकेचे वाचन चीफ अकौंटंट शैलेश देशमुख यांनी केले. कारखान्याची गाळप क्षमता २५०० मेट्रिक टनावरून ६००० टन करणे यासह सर्व विषय एकमताने मंजूर करण्यात आले. कारखान्याचे संस्थापक दिवंगत विलासराव पाटील यांचा पूर्णाकृती पुतळा कारखाना कार्यस्थळावर उभा करण्यात यावा, अशी आप्पासाहेब गरुड यांनी ऐनवेळच्या विषयात सूचना मांडली. त्यासही सभेने एकमताने संमती दिली.

सभेत बोलताना ॲड. उदयसिंह पाटील म्हणाले, रयत कारखाना उभारणी पाठीमागे संस्थापक विलासराव पाटील यांचा जो उद्देश होता, तो सफल होताना दिसत आहे. आज आपल्यात काका नाहीत, मात्र त्यांचे विचार जोपासण्याचे काम आम्ही करत आहोत. गेली ५० वर्षे विलासराव पाटील काकांनी सहकार, समाजकारण, राजकारणाला मार्गदर्शन केले. रयत कारखान्यासारख्या संस्था उभारल्या. याचबरोबर जिल्ह्यात जिल्हा बँकेच्या माध्यमातून काम करताना सेवा सोसायटी केंद्रबिंदू मानून शेतकरी बळकट करण्याचे काम केले.

रयत कारखाना अडचणीतून बाहेर पडला आहे. येणाऱ्या वर्षभरात रयत पूर्ण कर्जमुक्त होईल. अथणी व्यवस्थापनाच्या सहकार्याने गाळप क्षमता विस्तारीकरण, सहप्रकल्प उभारणी करून ऊस उत्पादक शेतकऱ्यांचे हित साधण्यासाठी कटिबद्ध राहील, अशी ग्वाहीही उदयसिंह पाटील यांनी शेवटी दिली.

रवींद्र देशमुख कारखान्याचा आढावा घेताना ते म्हणाले, चालू गळीत हंगामात कारखान्याने ४ लाख ५८ हजार टन गाळप केले आहे. १२.३३ टक्के इतका चांगला साखर उतारा राखत ५ लाख ६० हजार क्विंटल साखर निर्मिती केली आहे. गाळपास आलेल्या उसाचे फेब्रुवारीअखेरपर्यंत प्रति टन २९०० रुपयेप्रमाणे ऊस बिल शेतकऱ्यांच्या खात्यावर पोहोच केले आहे. कराराप्रमाणे बँकांच्या ४७ कोटी देय रकमेपैकी सहा वर्षात ४५ कोटी परतफेड केली आहे. या वर्षात कारखान्याची गाळप क्षमता विस्तारीकरण करणार असल्याचे त्यांनी यावेळी जाहीर केले.

फोटी ओळी:-

रयत सहकारी साखर कारखान्याच्या २४ व्या वार्षिक सर्वसाधारण सभेत बोलताना कारखान्याचे अध्यक्ष ॲड. उदयसिंह पाटील-उंडाळकर, व्यासपीठावर रवींद्र देशमुख, आप्पासाहेब गरुड, वसंतराव जगदाळे व मान्यवर.

Web Title: Decision to increase the crushing capacity of Rayat factory

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.