कोयना संघाचे निर्णय क्रांतिकारक : इंगवले
By Admin | Published: December 30, 2015 10:52 PM2015-12-30T22:52:47+5:302015-12-31T00:30:43+5:30
उंडाळे : स्थानिक दूध संकलन संस्थांना संगणक; ‘संस्था आॅडिट फी’मध्येही सवलत
कऱ्हाड : ‘कोयना सहकारी दूध उत्पादक संघाने दूध उत्पादक, स्थानिक दूध संकलन संस्था सभासदांच्या हितासाठी दूध उत्पादक सभासदांस थेट बोनस, दूध उत्पादन वाढविण्यासाठी खाद्य व स्थानिक दूध संकलन संस्थांना संगणक आणि संस्था आॅडिट फी मध्ये सवलत असे क्रांतिकारी निर्णय घेतले आहेत.’ अशी माहिती कोयना सहकारी दूध संघाचे अध्यक्ष संपतराव इंगवले यांनी
दिली.उंडाळे, ता. कऱ्हाड येथील ज्योतिर्लिंग सहकारी दूध संस्थेस भेट दिली. याप्रसंगी ते बोलत होते.यावेळी संघाचे दूध संकलन व्यवस्थापक तानाजी पाटील, पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जगदीश जाधव, सुपरवायझर सागर पवार, महिला निर्देशिका अपेक्षा पाटील, डॉ. संदीप पवार, रामचंद्र पाटील, अर्जुन पाटील आदी या कार्यक्रमास उपस्थित होते.संपतराव इंगवले म्हणाले, ‘माजीमंत्री विलासराव पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली संघाची प्रगती स्वयंपूर्णतेकडे सुरू आहे. यावेळी निसर्ग महिला दूध संस्था कालेटेक, हनुमान, दूध संस्था धोंडेवाडी, नांदगाव दूध संस्था नांदगाव, दत्त दूध संस्था साळशिरंबे आदी संस्थांना भेटी देण्यात आल्या.
संघाचे पशुसंवर्धन अधिकारी डॉ. जयदीप जाधव, संकलन व्यवस्थापक तानाजी पाटील यांनी माहिती दिली. अध्यक्ष रामचंद्र पाटील यांनी प्रास्ताविक केले.उपाध्यक्ष अर्जुन पाटील, रामचंद्र पाटील, श्रीरंग पाटील, सुनील थोरात यांनी उपस्थितांचे स्वागत केले. अनिल आंबवडे यांनी सूत्रसंचालन केले.यावेळी सुनील आंबवडे, अरुण साळुंखे, वैजयंता साळुंखे, महादेव आडके, प्रल्हाद पाटील, सागर पवार, किसन शेवाळे, दीपक आंबवडे, छाया यादव, सुनंदा यादव, पवित्रा लिपारे, रघुनाथ पाटील, प्रकाश मोरे, प्रकाश काकडे, अधिकराव पाटील, टी. के. पाटील, भानुदास पाटील, जालिंदर देशमुख, संदीप पाटील आदिंसह ग्रामस्थ उपस्थित होते. (प्रतिनिधी)