वळसे गावात जनता कर्फ्यूचा निर्णय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 17, 2021 04:37 AM2021-05-17T04:37:28+5:302021-05-17T04:37:28+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वळसे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कोरोना समितीच्यावतीने ...
लोकमत न्यूज नेटवर्क
शेंद्रे : कोरोना विषाणूचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेऊन वळसे ग्रामपंचायतीचे सरपंच, उपसरपंच, सदस्य व कोरोना समितीच्यावतीने ३१ मेपर्यंत जनता कर्फ्यू पाळण्याचा निर्णय घेण्यात आला आहे.
वळसे गावात गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णांची संख्या वाढत असल्याने गावातील लोकांमध्ये भीतीचे वातावरण आहे. वळसे गावात एकूण १५ कोरोनाबाधित आहेत. त्यामुळे सर्वांनुमते ३१ मेपर्यंत लॉकडाऊन केल्याशिवाय कोरोना विषाणूची साखळी तुटणार नाही, यावर एकमत झाले. त्यामुळे ३१ मेपर्यंत वळसे गावातील सर्व दुकानदार, व्यावसायिकांनी कडक लॉकडाऊन पाळण्याचा निर्णय घेतला. त्यामुळे वळसे परिसरातील सर्व लोकांनी कोरोना विषाणूची साखळी तोडण्यासाठी नियमांचे पालन करून प्रशासनाला सहकार्य करावे, असे आवाहन सरपंच दीपाली कदम यांनी केले आहे.
फोटो: १६वळसे
वळसे (ता. सातारा) येथे जनता कर्फ्यूमुळे गावचा मुख्य प्रवेशद्वार असलेला रस्ता बंद करण्यात आला आहे. (छाया : सागर नावडकर)