जिल्ह्यात कोरोना रुग्णवाढीत घसरण
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 14, 2021 04:46 AM2021-09-14T04:46:08+5:302021-09-14T04:46:08+5:30
सातारा : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाल्याचे चित्र आहे. सोमवारी १८५ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, ...
सातारा : जिल्ह्यात कोरोनाग्रस्त रुग्णांच्या संख्येत आणखी घट झाल्याचे चित्र आहे. सोमवारी १८५ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले असून, एका बाधिताचा मृत्यू झाला आहे.
जिल्ह्यात सुरुवातीपासूनच सातारा, कऱ्हाड व फलटण तालुक्यांतील कोरोनाबाधित रुग्णांची संख्या मोठी होती. या तिन्ही मोठ्या तालुक्यांमध्ये आता कोरोना रुग्णांची संख्या कमी झालेली आहे. जावली ४, कऱ्हाड १७, खंडाळा ७, खटाव १६, कोरेगाव १४, माण १८, महाबळेश्वर २, पाटण ३, फलटण ६४, सातारा २७, वाई ५ व इतर ८ असे आजअखेर एकूण २ लाख ४४ हजार ६८९ नागरिकांचे अहवाल कोरोनाबाधित आले आहेत. तसेच सोमवारी मृत्यू झालेल्या बाधिताची संख्या माण १, अशी असून आजअखेर जिल्ह्यामधील एकूण मृत्यूंची संख्या ६ हजार ५५ झालेली आहे.
जिल्ह्यात विविध रुग्णालयांत आणि कोरोना केअर सेंटर, डीसीएचसी व सीसीसीमधून सोमवारी संध्याकाळपर्यंत ८४० जणांना घरी सोडण्यात आले. ८ हजार ५५६ रुग्णांवर उपचार सुरू असल्याची माहिती जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. सुभाष चव्हाण यांनी दिली.