मागणीत घट..

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 13, 2021 05:42 AM2021-01-13T05:42:25+5:302021-01-13T05:42:25+5:30

............................ बुद्धिबळ स्पर्धेत यश सातारा : कारदगा (कर्नाटक) येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत थ्री टू वन चेस अकॅडमीच्या मनोरमा ...

Decline in demand .. | मागणीत घट..

मागणीत घट..

Next

............................

बुद्धिबळ स्पर्धेत यश

सातारा : कारदगा (कर्नाटक) येथे झालेल्या राज्यस्तरीय बुद्धिबळ स्पर्धेत थ्री टू वन चेस अकॅडमीच्या मनोरमा संजय कुलकर्णी हिने सर्वोकृष्ट महिला खेळाडू म्हणून तृतीय क्रमांक मिळविला. ही कामगिरी करताना तिने तिच्यापेक्षा जास्त यलो रेटिंग असलेल्या दोन खेळाडूंना पराभूत करून यश मिळविले.

.....................................

बाजारपेठेत गर्दी

सातारा : संक्रांतीसाठी लागणाऱ्या सुगडसह वाण-वंसाचे साहित्य खरेदीसाठी महिलांच्या गर्दीने बाजारपेठ फुलली आहे. साखरेच्या दरात वाढ झाली नसल्याने काटेरी हलवा, रेवड्या, तिळगुळाच्या वड्यांच्या दरात कोणतीही वाढ झालेली नाही.

..................................................

हायटेक प्रचार

सातारा : राजकीयदृष्ट्या अतिशय जागरूक व संवेदनशील समजल्या जाणाऱ्या आणि अनेक प्रमुख नेतेमंडळींसाठी प्रतिष्ठेच्या असलेल्या अनेक ग्रामपंचायत निवडणुकांनी राजकीय वातावरण ढवळून निघाले आहे. अनेक गावांचा रिमोट कंट्रोल स्थानिक नेत्यांकडे असल्याने याची कार्यकर्त्यांकडून काळजी घेतली जात आहे.

.............................

पिके भुईसपाट

महाबळेश्वर : आधीच थंडीने गारठलेल्या महाबळेश्वर व जावळी तालुक्यात सध्या रोज अवकाळी पाऊस हजेरी लावत असल्याने रब्बी हंगामातील पिके पूर्ण भुईसपाट झाली आहेत. अवकाळी पावसाच्या सरीही बरसत आहेत. दोन्ही तालुक्यांमध्ये सध्या रब्बी हंगामाची ज्वारी, हरभरा, गहू ही पिके प्रामुख्याने घेतली आहेत.

........................................

ग्राहक दिन साजरा

सातारा : नेर फाटा (ता. खटाव) येथील श्रीनिधी पेट्रोल पंपावर ग्राहक दिन साजरा करण्यात आला. यावेळी पेट्रोल पंपाच्यावतीने विविध उपक्रम राबविण्यात आले. गेली १५ वर्षे श्रीनिधी पेट्रोल पंप ग्राहकांना अविरतपणे सेवा देत आहे. यावेळी ग्राहकांना मास्क व सॅनिटायझरचे वाटप करण्यात आले.

....................................................

विष्णू ढेबेंचा गौरव

पाचगणी : ‘माझी वसुंधरा’ या पर्यावरण जागृती उपक्रमात चिखली (ता. महाबळेश्वर) येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेला विशेष कार्याबद्दल व शाळेचे उपक्रमशील शिक्षक विष्णू ढेबे यांचा वसुंधरा मित्र पुरस्काराने गौरव करण्यात आला.

...................................

आवक वाढली

सातारा : सातारा कृषी उत्पन्न बाजार समितीत वाटाण्याची आवक मोठ्या प्रमाणावर झाली आहे. त्यामुळे त्याचे दरही कमी झाले आहेत. साहजिकच वाटाण्याला मागणीही वाढत आहे. साताऱ्याच्या बाजारात सरासरी तीस ते चाळीस रुपये किलो दराने विक्री केली जात आहे.

........................

क्रीडांगणे ओस

सातारा : कोरोनानंतर शाळा-महाविद्यालये बंद करण्यात आली आहेत. नववी, दहावीचे वर्ग सुरू झाले असले तरी मैदानावर कोणालाही खेळण्यासाठी सोडले जात नाही. त्यामुळे शाळांची मैदाने ओस पडली आहेत. शाळा कधी सुरू होतात, याकडे नागरिकांचे लक्ष लागून राहिले आहे.

.....................

थंडीचे प्रमाण कमी

खटाव : सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर, पाचगणी, सातारा, कोयनानगर परिसरात थंडीचे प्रमाण वाढल्याने हुडहुडी भरली असली तरी, खटाव तालुक्यात थंडीचे प्रमाण कमी झाले आहे. त्यामुळे काही प्रमाणात दिलासा मिळत आहे. थंडी कमी झाल्याने शेतकरी शेतीवर कामे करण्यासाठी जात आहेत.

....................................................

दुकानात सॅनिटायझर

सातारा : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव पाहता, शहरात येथील व्यापाऱ्यांनी दुकानात माल खरेदी करण्यासाठी येणाऱ्या ग्राहकांना कोरोनापासून दूर ठेवण्यासाठी अनेक उपाययोजना आखल्या आहेत. वाई शहरात व ग्रामीण भागात कोरोनाचा वाढता संसर्ग पाहता, व्यापारी योग्य ती काळजी घेत दुकानामध्ये सॅनिटायझरचा वापर करत आहेत.

................................................................

जनावरांचा त्रास

वडूज : शहरात मोकाट जनावरांच्या झुंडीच्या झुंडी फिरत असून, अनेकदा ही जनावरे रस्त्यावरच ठाण मांडून बसत आहेत. नागरिकांबरोबरच वाहनधारकांनाही याचा नाहक त्रास होत आहे. या जनावरांचा बंदोबस्त करण्याची मागणी नागरिकांतून होत आहे.

...............................

क्षेत्र माहुलीजवळ खड्डे

सातारा : कोरोना लॉकडाऊनपूर्वी सातारा-लातूर महामार्गाच्या कामासाठी क्षेत्र माहुली ते कृष्णा नदी पुलादरम्यान सुमारे ७०० मीटर रस्ता खणून पडला असून, त्यामध्ये अक्षरश: तीन ते चार फुटांचे खड्डे पडले आहेत. त्यामुळे या ठिकाणी दररोज अपघातासारख्या घटनेत वाढ होत आहे.

.......................

घाणीच्या विळख्यात

सातारा : जुना मोटर स्टॅँड परिसरात रस्त्यावर भरणाऱ्या भाजी मंडईमुळे ठिकठिकाणी घाणीचे साम्राज्य पसरले आहे. शहरातील काही विक्रेत्यांना रस्त्यावर बसूनच भाजी विक्री करावी लागत आहे. या ठिकाणी कचराकुंडीची व्यवस्था नसल्याने विक्रेते सायंकाळी विक्रीयोग्य नसलेला भाजीपाला रस्त्यावरच टाकत आहेत.

Web Title: Decline in demand ..

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.