कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट, पण..

By ऑनलाइन लोकमत | Published: January 28, 2022 04:26 PM2022-01-28T16:26:46+5:302022-01-28T16:27:32+5:30

पाणीपातळीत घट होत असली तरी पाणी टंचाईचा सामना करावा लागणार नाही.

Decrease in water level of Kas Lake | कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट, पण..

कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट, पण..

Next

पेट्री : शहराला पाणीपुरवठा करणाऱ्या कास तलावाच्या पाणीपातळीत दिवसेंदिवस घट होत असून पाणीपातळी खालावू लागली आहे. सद्य:स्थितीला तलावात साडेसतरा फुटांपर्यंत पाणीसाठा शिल्लक आहे. गतवर्षी डिसेंबरच्या अखेरीस अठरा फूट पाणीसाठा शिल्लक होता. परंतु यंदा नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे सध्या गतवर्षीपेक्षा दीड ते दोन फूट पाणीसाठा अधिक शिल्लक आहे.

कास तलावात किनाऱ्यालगत पंचवीस फुटांपर्यंत पाणीसाठा होतो. गतवर्षी डिसेंबर महिन्याच्या अखेरीस अठरा फूट पाणीसाठा शिल्लक होता. यंदा आजमितीला सध्या ही पाणी पातळी साडेसतरा फुटांवर आहे. सातारा शहराला होत असलेल्या पाणीपुरवठ्यामुळे दर दोन दिवसांला तलावातील पाणी पातळी एक ते दीड इंचाने कमी होत आहे. 

पाणीसाठा पावसाळ्यांपर्यंत टिकून राहावा, यासाठी पाण्याचा काटकसरीने वापर करणे आवश्यक आहे. एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. सद्य:स्थितीला तलावातील पाणीसाठा पाहता फेब्रुवारी महिन्यात तलावाचा पहिला व्हॉल्व्ह उघडा पडण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा...

एकूण तीन व्हॉल्व्हद्वारे पाणीपुरवठा केल्या जाणाऱ्या कास तलावातील पहिला व्हॉल्व्ह गतवर्षी जानेवारी महिन्यात उघडा पडला होता. साधारण एप्रिल अखेरीस ते मे महिन्याच्या सुरुवातीस दुसरा व्हॉल्व्ह उघडा पडला जातो. दगड अथवा अन्य कोणतीही वस्तू अडकून पाणीपुरवठा खंडित होऊ नये, यासाठी पालिकेने सर्वात खालच्या व्हॉल्व्हवर जाळी बसविलेली आहे.

सध्या कास तलावात साडेसतरा फूट पाणीसाठा शिल्लक असून यंदा नोव्हेंबर महिन्यातील अवकाळी पावसामुळे गतवर्षीपेक्षा दीड फूट पाणीसाठा जास्त प्रमाणात शिल्लक आहे. तरीदेखील नागरिकांनी काटकसरीने पाण्याचा वापर करावा. - जयराम किर्दत, पाटकरी, कास तलाव

Web Title: Decrease in water level of Kas Lake

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.