सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कामांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 24, 2021 04:46 AM2021-09-24T04:46:22+5:302021-09-24T04:46:22+5:30

कराड सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा कोनशिला अनावरण ...

Dedication ceremony of works in Satara, Sangli, Kolhapur districts by Nitin Gadkari | सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कामांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

सातारा, सांगली, कोल्हापूर जिल्ह्यातील कामांचा नितीन गडकरी यांच्या हस्ते लोकार्पण सोहळा

Next

कराड

सातारा, सांगली आणि कोल्हापूर जिल्ह्यातील विविध राष्ट्रीय महामार्ग, राज्यमार्ग प्राधिकरण व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या विविध कामांचा कोनशिला अनावरण व लोकार्पण सोहळा शनिवारी ( दि. २५) केंद्रीय रस्ते वाहतूक आणि महामार्ग मंत्री नितीन गडकरी यांच्या हस्ते होणार आहे.

कराड येथील फर्न हॉटेलमध्ये होणाऱ्या या समारंभात ५ हजार ९७१ कोटी रुपयांची ४०३ किलोमीटरच्या रस्त्यांचे उद्घाटन यावेळी होणार आहे. कागल ते सातारा रस्त्याचे सहा पदरीकरण, महामार्गावरील मसूर फाटा इंदोली काशीळ येथे अंडरपास पुलाचे भूमिपूजन, मिरज येथे रस्त्याची सुधारणा, आजरा ते आंबोली ते संकेश्वर रस्त्याचे उन्नतीकरण, कळे ते कोल्हापूर रस्त्याचे उन्नतीकरण, आणि घाट माता ते हेळवाक रस्त्याचे मजबुतीकरण आदी कामांचा यात समावेश आहे.

त्याबरोबरच नागज ते मुचंडी रस्त्यासह तासगाव ते शिरढोण रस्ता लोकार्पण सोहळा या वेळी होणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाच्या सेंट्रल रस्ते निधी अंतर्गत डिचोली - हेळवाक - वाहटळ - शेणोली स्टेशन पाटण तारळे काशीळ रस्त्यासह वाल्हे जेजुरी लोणंद सातारा रस्त्याचे चौपदरीकरण यात होणार आहे. शिरसवाडी शेनवडी खेराडे रस्ता मांडवे नागठाणे नांदगाव आणि फलटण असू तावशी आधी रस्त्यांची सुधारणा कामांचाही याचा समावेश आहे.

केंद्रीय मंत्री नितिन गडकरी यांच्यासह सार्वजनिक बांधकाम मंत्री अशोक चव्हाण, विधान परिषद सभापती रामराजे नाईक निंबाळकर, सातारचे पालकमंत्री बाळासाहेब पाटील, गृहराज्यमंत्री सतेज पाटील, ग्रामविकास मंत्री हसन मुश्रीफ, जलसंपदा मंत्री जयंत पाटील, खासदार श्रीनिवास पाटील, खासदार संभाजीराजे, खासदार उदयनराजे भोसले, गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई, खासदार संजय मंडलिक, खासदार धैर्यशील माने, खासदार संजय पाटील, खासदार रणजित नाईक निंबाळकर, आमदार पृथ्वीराज चव्हाण, आमदार शिवेंद्रराजे भोसले, शशिकांत शिंदे, आमदार मोहनराव कदम, अरुण लाड, आमदार गोपीचंद पडळकर, आमदार सदाभाऊ खोत, आमदार जयंत आसगावकर, आमदार पी. एन. पाटील, दीपक चव्हाण, आमदार सुरेश खाडे, प्रकाश आबिटकर, आमदार मानसिंगराव नाईक, आमदार सुमन पाटील, आमदार जयकुमार गोरे, आमदार राजू आवळे, आमदार महेश शिंदे विक्रम सिंह सावंत, आमदार ऋतुराज पाटील, कराडच्या नगराध्यक्ष रोहिणी शिंदे आदी उपस्थित राहणार आहेत.

या कामांचा कोनशिला अनावरण

रा. म. ४८ च्या कागल - सातारा या रस्त्याचे सहापदरीकरण

रा. म. ४८ वरील मसूरफाट, इंदोली, काशीळ रस्ता अपघात प्रवण क्षेत्र सुधारणा

रा. म. १६६ वरील मिरज शहरांतर्गत रस्त्यांची एक वेळ सुधारणा

रा. म. ५४८ वरील आजरा - अंबोली - संकेश्वर विभागाचे उन्नतीकरण

रा. म. १६६ वरील कळे - कोल्हापूर विभागाचे उन्नतीकरण

रा. म. १६६ वर घाटमाथा ते हेळवाक विभाग मजबुतीकरण

भा. रा. म. प्रा. क्रमांक ८ केंद्रीय रस्ते बजेट मधून राज्य रस्त्यांची सुधारणा

लोकापर्ण समारंभ

रा. म. १४४ ई वरील नागगज ते मुचंडी विभागाचे उन्नतीकरण

रा. म. २६६ वरील तासगाव ते शिरढोण विभागाचे उन्नतीकरण

सातारा जिल्ह्यातील सेंट्रल रस्ते निधिअंतर्गत कामे

डिचोली - हेळवाक - वहाटळ- शेणोली स्टेशन रत्त्याची विभाग सुधारणा

पाटण - तारळे - काशीळ - रस्त्याची सुधारणा

बेल्हे - जेजुरी - लोणंद - सातारा रस्त्याच्या चौपदरीकरणासाठी सुधारणा

शिरसावडी - शेणवडी - खेराडे विभागाच्या रस्त्याची सुधारणा

मांडवी - नागठाणे - नांदगाव - रस्त्याची सुधारणा

फलटण - आसू - तावशी - जिल्ह्याच्या सीमा रस्त्यांची सुधारणा

बुध - निढळ - पेडगाव- वडूज - रस्त्याची सुधारणा

फलटण - उपळवे - कुळकजाई रस्त्यांची सुधारणा

Web Title: Dedication ceremony of works in Satara, Sangli, Kolhapur districts by Nitin Gadkari

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.