आमदार झाल्यानंतर शपथविधीसाठी दीपक चव्हाण यांचा एसटीने मुंबई प्रवास
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 12, 2021 04:44 AM2021-08-12T04:44:03+5:302021-08-12T04:44:03+5:30
सातारा : आमदार, खासदार यांच्यासाठी एसटीमध्ये आसन आरक्षित ठेवलेले असते. सांगोल्याचे आमदार दिवंगत गणपतराव देशमुख एसटीने प्रवास करत होते. ...
सातारा : आमदार, खासदार यांच्यासाठी एसटीमध्ये आसन आरक्षित ठेवलेले असते. सांगोल्याचे आमदार दिवंगत गणपतराव देशमुख एसटीने प्रवास करत होते. अलीकडे असे आमदार दिसत नाहीत. फलटणचे आमदार दीपक चव्हाण सर्वप्रथम शपथविधीसाठी एसटीने मुंबईला गेले होते.
कधी एसटी प्रवास केला आहे का?
मी आमदार होईपर्यंत एसटीनेच प्रवास करत होतो. त्यानंतरही २००९ मध्ये पहिल्यांदा आमदार झाल्यानंतर शपथविधीसाठी एका कार्यकर्त्यासमवेत एसटीनेच मुंबईला गेलाे होतो.
- दीपक चव्हाण, आमदार
माझा एसटीने शेवटचा प्रवास १९९४-९५ मध्ये झाला. गावी जात असताना वाटेतच गाडी बंद पडली. त्यामुळे एसटीने मी गावी गेलो होतो. आमदार होण्यापूर्वी अनेकदा एसटीने गेलो होतो.
- शशिकांत शिंदे, आमदार
चौकट
चारचाकीत फिरणाऱ्यांना कशाला हवी सवलत?
राज्य परिवहन महामंडळाकडून आमदार, खासदारांसाठी आसन आरक्षित असते. प्रवास मोफत असतो. या लोकप्रतिनिधींकडे स्वत:च्या चारचाकी गाड्या आहेत. अशा नेत्यांसाठी एसटीने प्रवास करण्यासाठी कशासाठी सवलत असायला हवी.
- सागर पाटील, प्रवासी
एसटीला गरीब रथ मानला जातो. आमदार, खासदारांनी एसटीने प्रवास केल्यास निश्चित अडचणी त्यांच्या लक्षात येऊ शकतात. त्यामुळे एसटीची परिस्थिती सुधारण्यास मदत होणार आहे.
- सुधाकर काळे, प्रवासी.