औंधच्या उपसरपंचपदी दिपक नलवडे बिनविरोध
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 26, 2019 04:12 PM2019-04-26T16:12:33+5:302019-04-26T16:14:28+5:30
खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणारी औंध ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिपक नलवडे यांची बिनविरोध निवड झाली.
औंध : खटाव तालुक्यातील राजकीयदृष्ट्या महत्वाची समजली जाणारी औंध ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदाच्या निवडणुकीत दिपक नलवडे यांची बिनविरोध निवड झाली.
औंध ग्रामपंचायतीची निवडणूक गेल्या महिन्यात झाली होती. राष्ट्रवादीच्या नेत्या गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी यांच्या नेतृत्वाखालील श्री यमाई विकास पॅनेलच्या सोनाली शैलेश मिठारी यांची अटीतटीच्या लढतीत लोकनियुक्त सरपंचपदी निवड झाली होती.
उपसरपंच निवडीसाठी गुरुवार, दि. २५ रोजी सरपंच सोनाली मिठारी यांच्या अध्यक्षतेखाली नवनिर्वाचित ग्रामपंचायत सदस्यांची बैठक घेण्यात आली. या बैठकीत श्री यमाई विकास पनेलच्या दिपक नलवडे यांचा एकमेव अर्ज आल्याने त्यांची सर्वानुमते निवड करण्यात आली. उपसरपंच पदाची निवडणूक पार पडताच कार्यकर्त्यांनी गुलालाची उधळण करत फटाक्यांची आतशबाजी करून जल्लोष केला.
माजी उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्या मार्गदर्शनाखाली औंधमध्ये केलेल्या विकासकामाच्या जोरावर श्री यमाई विकास पॅनेलने सरपंच पदासह नऊ जागा जिंकून ग्रामपंचायतीची निर्विवाद सत्ता हस्तगत केली. ग्रामपंचायतीची सत्ता काबीज करण्यासाठी राजकन्या चारुशीलाराजे पंतप्रतिनिधी यांनी नेतृत्वाचा करीश्मा दाखवून विरोधी पॅनेलला पराभवाची धूळ चारली होती.
या निवडणुकीत जगदंबा परिवर्तन विकास पॅनेलने सहा जागा तर एक ठिकाणी अपक्ष उमेदवार विजयी झाला होता. त्यामुळे उपसरपंचपदाच्या निवडणुकीत परिवर्तन पॅनेलचे सदस्य कोणती भूमिका घेणार याकडे सर्वांचे लक्ष लागले होते. मात्र उपसरपंचपदाची निवडणूक न लढवता त्यांनी निवडणूक बिनविरोध करण्याचा निर्णय घेतला. निवडणूक निरीक्षक म्हणून मंडलाधिकारी प्रताप राऊत यांनी काम पाहिले.
नवनिर्वाचित सरपंच उपसरपंच यांचे गायत्रीदेवी पंतप्रतिनिधी, हणमंतराव शिंदे, माजी सरपंच नंदीनी इंगळे, सचिन शिंदे, राजेंद्र माने, आब्बास आत्तार, वसंतराव माने, गणेश देशमुख, गणेश हरिदास, वाहीद मुल्ला, संदीप चव्हाण, भरतबुवा यादव, रमेश जगदाळे, इलियास पटवेकरी, बापूसाहेब कुंभार, युवराज रणदिवे, तुषार रणदिवे, सनातन रणदिवे, कुलदीप इंगळे, गणेश इंगळे, वामन पवार, महादेव जाधव, मंदार कुंभार, विक्रम शिंदे, विशाल ओतारी, शुभम इनामदार, शुभम शिंदे, श्रीपाद सुतार, रोहित मगर, विशाल भोसले यांनी कौतूक केले.