मानवाधिकार जिल्हाध्यक्षपदी दीपाली गोडसे यांची निवड

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 16, 2021 04:39 AM2021-02-16T04:39:01+5:302021-02-16T04:39:01+5:30

सातारा : सातारा विकास आघाडीच्या माजी उपनगराध्यक्षा दीपाली राजू गोडसे यांची मानव सुरक्षा संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. ...

Deepali Godse elected as Human Rights District President | मानवाधिकार जिल्हाध्यक्षपदी दीपाली गोडसे यांची निवड

मानवाधिकार जिल्हाध्यक्षपदी दीपाली गोडसे यांची निवड

Next

सातारा : सातारा विकास आघाडीच्या माजी उपनगराध्यक्षा दीपाली राजू गोडसे यांची मानव सुरक्षा संघाच्या जिल्हा अध्यक्षपदी निवड झाली. या निवडीचे पत्र खासदार उदयनराजे भोसले यांनी त्यांना नुकतेच दिले. प्रत्येक क्षेत्रातील अन्यायग्रस्त नागरिकांना योग्य तो न्याय त्यांच्या माध्यमातून मिळेल, असा विश्वास यावेळी उदयनराजे यांनी व्यक्त केला.

यावेळी दीपाली गोडसे म्हणाल्या, लवकरच मानव सुरक्षा संघाच्या जिल्हा कार्यकारिणीची निवड करण्यात येईल. त्यानंतर सातारा शहरात महाराष्ट्र राज्याचा मानव सुरक्षा महासंघाचा महामेळावा आयोजित केला जाईल. समाजातील गोर-गरीब, कष्टकरी, वंचित लोकांच्या समस्या तातडीने सोडविल्या जातील.

या निवडीबद्दल उपनगराध्यक्ष मनोज शेंडे, ॲड. दत्ता बनकर, पाणी पुरवठा सभापती स्मिता हादगे, राजू गोडसे, सुहास राजेशिर्के आदींनी त्यांचे काैतुक केले.

फोटो : १५ दीपाली गोडसे

फोटो ओळ : सातारा येथे खासदार उदयनराजे भोसले यांच्याहस्ते दीपाली गोडसे यांना मानवाधिकार जिल्हा अध्यक्षपदी निवड झाल्याचे नियुक्तीपत्र देण्यात आले.

Web Title: Deepali Godse elected as Human Rights District President

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.