मोरगिरीत राष्ट्रवादीला 'दे धक्का', मंत्री शंभुराज देसाईंच्या गटीने जिंकली ग्रामपंचायत
By दीपक शिंदे | Published: October 17, 2022 03:39 PM2022-10-17T15:39:03+5:302022-10-17T15:39:10+5:30
राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका झाल्या.
दीपक शिंदे
सातारा : पाटण तालुक्यात दोन ग्रामपंचायती मध्ये झालेल्या मत मोजणीत मोरगिरीमध्ये सत्तांतर तर घाणव ग्रामपंचायत मध्ये जैसे थे परिस्थिती राहिली आहे. मोरगिरीमधील निकाल हा राष्ट्रवादी पक्षाच्या कार्यकर्त्यांना चिंतन करायला लावणारा आहे. पाटण तालुक्यातील मुदत संपणाऱ्या पाच ग्रामपंचायतींपैकी दोन ग्रामपंचायतींच्या सार्वत्रिक निवडणुकीसाठी रविवार मतदान झाले. त्याची मतमोजणी सोमवार दि. १७ रोजी पाटण येथील जुन्या तहसील कचेरीतील प्रतिक्षालयात सकाळी १० वाजता शांततेत पार पडली .
राज्यात झालेल्या राजकीय घडामोडीनंतर तालुक्यात प्रथमच ग्रामपंचायती निवडणुका झाल्या. त्यात मंत्री शंभूराज देसाईंचा बालेकिल्ला असलेल्या मोरणा विभागातील महत्वाची असलेल्या मोरगिरी ग्रामपंचयातीत सत्तांतर घडवून देसाई गटाने आपला करिश्मा दाखवत मोरणा विभाग हा माझा बालेकिल्ला असल्याचे निकालातून सांगितले. तर घाणव या ग्रामपंचायतीत पाटणकर गटांनी आपली सत्ता अबाधित ठेवली मोरगिरी ग्रामपंचायतीत थेट सरपंच म्हणून गुरव अर्चना किरण यांना ६४१ मते मिळवून विजयी झाल्या. वार्ड क्र १ मध्ये मोरे सचिन कृष्णाजी २५४, कुंभार सरिता कृष्णत २५८, मोरे वैशाली सचिन २५८ वार्ड क्र २ मध्ये सुतार संदीप गजानन १६२,गुरव सुनीता सुरेश १६९ वार्ड क. ३ चव्हाण निर्मला रावसाहेब १६४ माने जगन्नाथ परशुराम १४७ मते मिळून विजयी झालेत तर घाणव ग्रामपंचायत मध्ये सविता आनंदा सूर्यवंशी २१६ मते घेऊन सरपंच म्हणून निवडून आल्या तर एका वार्ड क्र १ मध्ये हेमलता दत्तात्रय देसाई या विजयी झाल्या.