निबंर्धांमुळे सातारा जिल्हा बँकेला ६ कोटींचा तोटा
By admin | Published: June 21, 2017 06:46 PM2017-06-21T18:46:38+5:302017-06-21T18:46:38+5:30
कोंडी फुटली : ३९९ कोटींच्या जुन्या नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारणार
आॅनलाईन लोकमत
सातारा , दि. २१ : शासनाच्या निबंर्धामुळे सातारा जिल्हा मध्यवर्ती बँकेला ६ कोटी रुपयांचा तोटा झाला असल्याची माहिती बँकेचे सरव्यवस्थापक डॉ. राजेंद्र सरकाळे यांनी ह्यलोकमतह्ण शी बोलताना दिली. दरम्यान, जिल्हा बँकेत नोटाबंदीच्या काळात जमा झालेल्या ३९९ कोटी रुपयांच्या जुन्या नोटांचा मार्ग अखेर मोकळा झाला आहे.
केंद्र सरकारने ८ नोव्हेंबर २0१६ रोजी नोटाबंदीचा निर्णय घेतला. या नोटा बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये जमा करण्यासाठी ३0 डिसेंबर २0१६ पर्यंत मुदत देण्यात आली होती. ग्राहकांनी नोटा जमा केल्या असल्या तरी बँकांकडे नोटा पडून आहेत. त्यामुळे बँकांना या निर्णयाने मोठा दिलासा मिळाला आहे.
जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँका आणि पोस्ट आॅफिसमध्ये पडून असलेल्या जुन्या ५00, १000 च्या नोटा रिझर्व्ह बँक आॅफ इंडिया स्वीकारणार आहे. अर्थ मंत्रायलाने याबाबत नोटिफिकेशन जारी केलं आहे. मागील आठवड्यात शिवसेना पक्ष प्रमुख उद्धव ठाकरे यांनी तशी मागणी केली होती आणि शिवसेनेचे मंत्री दिवाकर रावते यांनीही सदर विषय लाउन धरला होता.
८ नोव्हेंबर २0१६ रोजी चलनातून ५00 आणि १000 च्या नोटा चलनातून रद्द करण्यात आल्या. त्यानंतर ३0 डिसेंबर २0१६ पर्यंत बँकांमध्ये आणि पोस्ट आॅफिसमध्ये जमा करण्यात आलेल्या नोटा रिझर्व्ह बँकेच्या कोणत्याही कार्यालयात स्वीकारल्या जातील, असं अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
जिल्हा बँकांमध्ये कोट्यवधी रुपयांची रक्कम पडून आहे. त्यामुळे शेतकऱ्यांना पीककर्ज देणेही बँकांना कठीण झाले आहे. त्या पार्श्वभूमीवर जिल्हा बँकांसाठी हा निर्णय दिलासादायक मानता येईल. रिझर्व्ह बँकेत जुन्या नोटा जमा केल्यानंतर नव्या स्वरुपातील रक्कम संबंधित बँकेच्या खात्यात जमा केली जाईल, असे अर्थमंत्रालयाने म्हटले आहे.
३९९ कोटींवरील व्याजाचे काय?
जिल्हा मध्यवर्ती बँकांवर जुन्या नोटा स्वीकारण्याबाबत निर्बंध घातले गेले. मात्र त्याआधी बँकेच्या खातेदारांकडून बँकेमध्ये ३९९ कोटी रुपये जमा केले होते. यावर होणार व्याज बँकेनेच सोसले. हे व्याज रिझर्व्ह बँक देणार का? याबाबत होणाऱ्या निर्णयाकडे सर्वांचे लक्ष लागले आहे.
जिल्हा बँकेची झाली होती कोंडी
एकीकडे रद्द नोटा रिझर्व्ह बँक स्वीकारत नाही, दुसरीकडे ठेवीदारांना व्याज तर द्यावं लागतं, अशी बँकांची अडचण झाली होती. नोटिफिकेशन जाहीर झाल्यानंतर पुढचे तीस दिवस ही रक्कम रिझर्व्ह बँकेत जमा करता येणार आहे.
या आल्या अडचणी
- कर्ज पुरवठ्यावर मयार्दा
- दैनंदिन कॅश व्यवहार मंदावले
- जिल्हा बँकांची एटीएम सुविधा बंद
- सर्वच व्यवहारांवर शिथिलता आली
- बँकेत जमा असणाऱ्या रकमेवर व्याज द्यावे लागले