अधिव्याख्यात्यांचे सहा महिन्यांपासून मानधन रखडले : तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांमध्ये संभ्रम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 24, 2019 07:37 PM2019-12-24T19:37:09+5:302019-12-24T19:39:16+5:30

सध्या प्राप्त विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या पत्रानुसार जुलै, आॅगस्टमध्ये जी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली होती, तीच पुन्हा देण्यासंदर्भात तसेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता तासिका तत्त्वावरील नियुक्तीसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्रे यापूर्वी देण्यात आली आहेत.

Defendants were honored for six months | अधिव्याख्यात्यांचे सहा महिन्यांपासून मानधन रखडले : तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांमध्ये संभ्रम

अधिव्याख्यात्यांचे सहा महिन्यांपासून मानधन रखडले : तासिका तत्त्वावर काम करणाऱ्यांमध्ये संभ्रम

Next
ठळक मुद्देविभागीय सहसंचालकांचा नवीन फतवाअधिव्याख्यात्यांची केवळ चेष्टा चालवली असल्याचे या अधिव्याख्यात्यांमधून नाराजीने बोलले जात आहे.

खटाव : महाविद्यालयामध्ये तासिका तत्त्वावर काम करणाºया अधिव्याख्यात्यांचे सहा महिन्यांपासून मानधन रखडले आहे. त्यात विभागीय सहसंचालकांनी अधिव्याख्यांच्या नियुक्तीची पुन्हा मान्यता घेण्याचा फतवा काढल्याने संभ्रम निर्माण झाला आहे.

सर्व आशसकीय, अनुदानित, कला, वणिज्य, विज्ञान, विधी व शिक्षण शास्त्र महाविद्यालयात सध्या कार्यरत असणाºया तासिका तत्त्वावरील अधिव्याख्यात्याच्या नियुक्त्या होऊन सहा महिने उलटले तरी अद्याप मानधन न मिळाले नाही. त्यामुळे त्यांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. त्यातच विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्याकडून नवीनच काढण्यात आलेल्या फतव्यामुळे तासिका तत्त्वावर काम करत असलेल्या अधिव्याख्यात्याच्या यापूर्वी झालेल्या नियुक्तीस पुन्हा मान्यता घेण्याबाबत संबंधित महाविद्यालयात पत्र आल्यामुळे सर्व तासिका तत्त्वावर काम करत असणा-या अधिव्याख्यातामध्ये संभ्रमावस्था निर्माण झाली आहे.

सध्या प्राप्त विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग कोल्हापूर यांच्या पत्रानुसार जुलै, आॅगस्टमध्ये जी आवश्यक कागदपत्रे देण्यात आली होती, तीच पुन्हा देण्यासंदर्भात तसेच २०१९-२० या शैक्षणिक वर्षाकरिता तासिका तत्त्वावरील नियुक्तीसंदर्भातील ना हरकत प्रमाणपत्रे यापूर्वी देण्यात आली आहेत. त्या नियुक्तींना विद्यापीठाची चेंजीस इन स्टाफ मान्यता मिळाल्यानंतर या कार्यालयाची अंतिम मान्यता घेऊन मानधनाचे प्रस्ताव सादर करावेत, अशा आशयाचे पत्र आल्याने पुन्हा नव्याने प्रस्ताव सादर करावे लागले आहेत.

आधीच तासिका तत्त्वावर काम करत असलेल्या अधिव्याख्यात्यांना दिले जाणारे मानधन तुटपुंजे असतानाच तेही वेळेत मिळत नसल्याने या अधिव्याख्यातांना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. बहुताश लोकांचे या मानधनावर कुटुंब अवलंबून असल्यामुळे मानधन वेळेत मिळत नसल्याने अनेक अडचणी येत आहेत. त्यातच विभागीय सहसंचालक उच्च शिक्षण विभाग यांच्याकडून नवनवीन फतवे काढून या अधिव्याख्यात्यांची केवळ चेष्टा चालवली असल्याचे या अधिव्याख्यात्यांमधून नाराजीने बोलले जात आहे.

 

Web Title: Defendants were honored for six months

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.