पुतळा हटविताना पोलिसांवर दगडफेक !

By admin | Published: January 26, 2016 01:02 AM2016-01-26T01:02:34+5:302016-01-26T01:02:34+5:30

म्हसवडमध्ये लाठीहल्ला : चाळीस जणांवर गुन्हा

Deletion of statue, police pellet! | पुतळा हटविताना पोलिसांवर दगडफेक !

पुतळा हटविताना पोलिसांवर दगडफेक !

Next

म्हसवड : येथील शिंगणापूर चौकात सोमवारी पहाटे कार्यकर्त्यांनी बसविलेला पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा विनापरवाना असल्याचे सांगत पालिकेने पोलिसांच्या मदतीने ताब्यात घेतला. तेव्हा संतप्त झालेल्या जमावाने एसटी, पालिका आणि पोलिसांच्या दोन गाड्यांवर दगडफेक केली. जमावाला पांगविण्यासाठी अखेर पोलिसांना सौम्य लाठीहल्ला करावा लागला. याप्रकरणी उपनगराध्यक्षासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
सोमवारी पहाटे तीनच्या सुमारास म्हसवडच्या शिंगणापूर चौकात रस्त्याच्या कडेला काही कार्यकर्त्यांकडून
पुण्यश्लोक अहिल्यादेवी होळकर यांचा अर्धाकृती पुतळा बसविण्यात येत असल्याचे पोलिसांच्या निदर्शनास आले. पोलिसांनी ही माहिती तत्काळ मुख्याधिकारी व पालिका कर्मचाऱ्यांना दिली. त्यानंतर संबंधित कर्मचारी-अधिकारी घटनास्थळी धावले. पुतळा बसविणाऱ्यांना पालिका कर्मचाऱ्यांनी समजावून सांगण्याचा प्रयत्न केला.
‘विनापरवाना पुतळा बसवू नका,’ असे सांगूनही जमाव ऐकण्याच्या मन:स्थितीत नव्हता. पालिका कर्मचारी व लोकांची बोलणी सुरू असतानाच अचानक दगडफेकीला सुरुवात झाली.
पोलीस जीप (एमएच ११ एबी ३१०, एमएच ११ एबी ५०१), पालिकेची जीप (एमएच ११ एबी ९०००) व एसटी बस (एमएच १४ बीटी ४६२८) वर दगडफेक करण्यात आली. पालिकेचे कर निरीक्षक दिलीप रणदिवे यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार उपनगराध्यक्ष डॉ. वसंत मासाळ (रा. म्हसवड), लुनेश गोरड (रा. दिडवाघवाडी), बाजार समितीचे संचालक युवराज बनगर (रा. पुळकोटी), ‘रासप’चे बबन वीरकर (रा. माळवाडी), राष्ट्रवादी युुवक काँग्रेसचे जिल्हा उपाध्यक्ष बाळू काळे (दिडवाघवाडी), पोपट मासाळ (रा. मासाळवाडी) व सुरेश पुकळे यांच्यासह चाळीस जणांवर गुन्हा दाखल केला आहे. निरीक्षक सुनील चव्हाण तपास करत आहेत. (प्रतिनिधी)

Web Title: Deletion of statue, police pellet!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.