पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक अन्नधान्य किट रवाना

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 31, 2021 04:38 AM2021-07-31T04:38:37+5:302021-07-31T04:38:37+5:30

लोणंद : आमदार मकरंद पाटील यांच्या एका हाकेला साद देत लोणंद राष्ट्रवादीकडून साठ ते सत्तर कुटुंबाना एक महिना ...

Delivery of essential food kits for flood victims | पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक अन्नधान्य किट रवाना

पूरग्रस्तांसाठी जीवनावश्यक अन्नधान्य किट रवाना

googlenewsNext

लोणंद

: आमदार मकरंद पाटील यांच्या एका हाकेला साद देत लोणंद राष्ट्रवादीकडून साठ ते सत्तर कुटुंबाना एक महिना पुरेल एवढ्या जीवनावश्यक अन्नधान्याचे किट पाठविण्यात आले.

वाई तालुक्यात अतिवृष्टी झालेल्या पूरग्रस्तांना लोणंद राष्ट्रवादीच्यावतीने ‘एक हात मदतीचा’ या उपक्रमाअंतर्गत दीड टन अन्नधान्य वाई तालुक्यात टेम्पोच्या माध्यमातून पाठविण्यात आले. यावेळी लोणंद फळविक्रेते संघटनेच्या माध्यमातून दोन हजार केळी वाई तालुक्यात पूरग्रस्तांना पाठविण्यात आले.

यावेळी माजी नगराध्यक्ष सचिन शेळके-पाटील, राष्ट्रवादीचे जिल्हा उपाध्यक्ष दयाभाऊ खरात, डॉ. नितीन सावंत, माजी उपनगराध्यक्ष लक्ष्मण तात्या शेळके, गटनेते हनुमंतराव शेळके, सुभाष घाडगे, भिकू कुरणे, विनोद क्षीरसागर, सागर शेळके, गौरव फाळके, शिवाजीराव शेळके, सुनील शेळके, रवींद्र क्षीरसागर, दादा जाधव, अरुण गालिंदे, बबलूभाई इनामदार, कल्लू मुल्ला, शफीभाई इनामदार, शंकराव क्षीरसागर, राजू रंगरेज, प्रवीण ननावरे, हेमंत पवार, अक्षय कुरणे, दीपक पाटील, विकास क्षीरसागर, दादा रणदीवे, राजुभाई कुरेशी, दीपक बाटे, हरीश्चंद्र डोईफोडे उपस्थित होते.

Web Title: Delivery of essential food kits for flood victims

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.