स्वच्छतेची मागणी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 29, 2021 04:38 AM2021-07-29T04:38:33+5:302021-07-29T04:38:33+5:30

कऱ्हाड : आगाशिवनगर येथील कॉलन्यांमध्ये स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. काही कॉलनींमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली ...

Demand for cleanliness | स्वच्छतेची मागणी

स्वच्छतेची मागणी

Next

कऱ्हाड : आगाशिवनगर येथील कॉलन्यांमध्ये स्वच्छता करण्याची मागणी केली जात आहे. काही कॉलनींमध्ये सर्वत्र कचरा पसरला आहे. झाडी वाढली आहे. कचरा उचलण्यासाठी कर्मचारी येत नाहीत. त्यामुळे दुर्गंधी पसरून अस्वच्छता निर्माण झाली आहे. याबाबत वेळोवेळी मागणी करूनही दुर्लक्ष केले जात आहे.

फलकाची दुरवस्था

कऱ्हाड : शामगाव घाट ते वाघेरी या रस्त्यावर अनेक ठिकाणी असलेल्या सूचना फलकांची दुरवस्था झाली आहे. रात्रीच्या वेळी वाहने चालविताना चालकांना दिशा समजत नसल्याने अपघात घडत आहेत. भुरटे चोर फलक उचकटून नेत आहेत. त्यामुळे रस्त्यावर केवळ फलकांचे सांगाडे शिल्लक आहेत. उपाययोजना करण्याची मागणी होत आहे.

रोपांची देखभाल

कऱ्हाड : सामाजिक वनीकरणाच्या माध्यमातून मोरगिरी ते नाटोशी रस्त्यानजीक लावलेल्या झाडांची देखभाल केली जात आहे. त्यामुळे ग्रामस्थांतून समाधान व्यक्त होत आहे. या रस्त्यालगत लावण्यात आलेल्या झाडांना पाणी देणे, आजूबाजूचे गवत काढणे, झाडांना खड्डे काढण्याचे काम केले जात आहे. या कामामुळे झाडांची वाढ चांगली झाली आहे.

विटा मार्ग खड्ड्यात

कऱ्हाड : येथील कृष्णा कॅनॉलपासून ओगलेवाडीपर्यंत कऱ्हाड-विटा मार्गाची मोठी दुरवस्था झाली आहे. ठिकठिकाणी मोठमोठे खड्डे पडले असून, अपघाताचा धोका वाढला आहे. त्याचबरोबर या मार्गालगत मोकाट श्वानांचा मोठ्या प्रमाणावर वावर असतो. तीन ते चार ठिकाणी स्थानिकांकडून कचराही टाकला जातो. त्यामुळेच वाहनचालकांना अडचणींचा सामना करावा लागत आहे.

Web Title: Demand for cleanliness

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.