आजारांना निमंत्रण देणाऱ्या बंधाऱ्याची भिंत पाडण्याची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 4, 2021 05:13 AM2021-03-04T05:13:24+5:302021-03-04T05:13:24+5:30
औंध : औंध येथील केदारेश्वर लोकवस्तीमधील बंधाऱ्यात पाणी साचून राहत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची भिंत ...
औंध : औंध येथील केदारेश्वर लोकवस्तीमधील बंधाऱ्यात पाणी साचून राहत असल्याने रोगराईला निमंत्रण मिळत आहे. त्यामुळे या बंधाऱ्याची भिंत पाडून पाणी साचू देऊ नये, या मागणीसाठी ग्रामपंचायत सदस्य सागर जगदाळे यांनी औंध येथील हनुमान मंदिरात उपोषण सुरू केले आहे.
सागर जगदाळे यांनी दिलेली माहिती अशी की, गावातील सांडपाणी, शौचालयाचे पाणी बंधाऱ्यात साचून राहत आहे. त्यामुळे पिण्याच्या पाण्याचा स्रोत खराब झाला आहे. बंधाऱ्याची भिंत पाडण्याबाबत ग्रामस्थ सातत्याने पाठपुरावा करीत आहेत. जिल्हाधिकारी कार्यालयाकडून १३ नोव्हेंबर २०१९ रोजी बंधारा पाडण्याबाबत पत्र मिळाले होते. मात्र, आरोग्याच्या प्रश्नाला बगल देण्याचे काम होत आहे.
प्रश्न निकाली निघेपर्यंत उपोषण सोडणार नाही.
दरम्यान, मंगळवारी लाक्षणिक चक्री उपोषण करून स्थानिक महिलांनी आंदोलनाला पाठिंबा दिला. सुनीता जाधव, संगीता जाधव, दुर्गा जाधव, निशा शिंदे यांनी उपोषण करून आंदोलनास पाठिंबा दिला.
कोट
जिल्हा कृषी अधिकाऱ्यांच्या सूचनेनुसार तालुका कृषी अधिकारी, मंडळ कृषी अधिकारी यांनी बंधाऱ्याची पाहणी करून लोकांच्या भावना समजून घेतल्या. तसा अहवाल जिल्हा कृषी अधीक्षकांना पाठविला आहे.
- अक्षय सावंत,
मंडळ कृषी अधिकारी, औंध.