थदाळे गावात औषध फवारणीची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 1, 2021 04:36 AM2021-05-01T04:36:30+5:302021-05-01T04:36:30+5:30
पळशी : माण तालुक्यातील थदाळे येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे थदाळे गावात ...
पळशी : माण तालुक्यातील थदाळे येथे कोरोना रुग्णांची संख्या दिवसेंदिवस वाढत असून, ग्रामस्थ भीतीच्या छायेत आहेत. त्यामुळे थदाळे गावात औषध फवारणी करावी, अशी मागणी माजी सरपंच शरद बोराटे व परिसरातील ग्रामस्थांनी केली आहे.
थदाळेची लोकसंख्या नऊशेच्या आसपास असून, गावात जवळपास ३५ ते ४० कोरोना रुग्ण आहेत. हे रुग्ण खुलेआम आसपासच्या गावात फिरताना दिसत आहेत. त्यामुळे ग्रामस्थांमध्ये भीतीचे वातावरण आहे.
प्रशासनाने वेळीच लक्ष घालून थदाळे ग्रामस्थांची आरोग्य तपासणी करावी व गाव परिसरात औषध फवारणी करावी, अशी मागणी माजी सरपंच शरद बोराडे यांनी केली आहे.
थदाळे गावातील लोक मुंबई, पुणे, बंगळुरू आदी ठिकाणी कामासाठी बाहेर असून, लॉकडाऊमुळे हे चाकरमानी गावाकडे येऊन लागले आहेत यामुळे थदाळे गावात कोरोनाची संख्या वाढताना दिसत आहे.