उड्डाणपुलाची मागणी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 24, 2021 04:37 AM2021-05-24T04:37:20+5:302021-05-24T04:37:20+5:30
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे ...
कऱ्हाड : येथील कोल्हापूर नाक्यावर नवीन उड्डाणपूल व्हावा, अशी मागणी केली जात आहे. पुणे-बंगळूर आशियाई महामार्गालगत कोल्हापूर नाका येथे वारंवार अपघात होऊन नागरिकांना जीव गमवावा लागत आहे. ही परिस्थिती लक्षात घेऊन कोल्हापूर नाक्यावर कोल्हापूर ते सातारा जाणाऱ्या लेनवर उड्डाणपूल होण्याची गरज आहे.
पिकांचे नुकसान
कुसूर : विंग, ता. कऱ्हाड येथे पिकांना आता रानडुकरांनी लक्ष केले आहे. विशेषत: येथील डोंगरपायथा परिसरात उभ्या पिकात कळपाकळपाने त्यांचा धुडगूस सुरू आहे. रातोरात पिके फस्त होऊ लागली आहेत. तोंडचा घास हिरावून नेल्यासारखी स्थिती येथील शेतकऱ्यांची झाली आहे.
शॉर्टसर्किटची भीती
तांबवे : विजेच्या खांबासह काही ठिकाणी तारांवरही झाडवेली वाढल्या आहेत. त्यामुळे शॉर्टसर्किट होऊन एखाद्याला जीव गमवावा लागेल, अशी स्थिती आहे. अनेक ठिकाणी विजेच्या खांबावरील प्रवाहित तारेपर्यंत हे वेल गेले आहेत. त्याचा धक्का बसून एखाद्याचा जीव जाण्याचा धोकाही त्यामुळे निर्माण झाला आहे. वीज वितरण कंपनीच्या दुर्लक्षामुळे हे वेल मोठ्या प्रमाणात वाढले आहेत.
कचरा टाकणाऱ्यांवर ‘वॉच’
कऱ्हाड : शहरात उघड्यावर कचरा टाकल्यास शंभर रुपयांपासून ते हजार रुपयांपर्यंत दंड केला जात आहे. पालिका प्रशासनाने हा निर्णय घेतला असून, याच्या कारवाईसाठी एक पथकही स्थापन केले आहे. या पथकातील अधिकारी तसेच कर्मचाऱ्यांकडून शहरात ठिकठिकाणी कचरा टाकणाऱ्यांवर वॉच ठेवला जात आहे. संबंधितांना पकडून त्यांच्याकडून दंडही वसूल केला जात आहे.